पुणे, १० एप्रिल २०२५: तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात विविध संघटना आणि राजकीय पक्षांद्वारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन होत आहेत. तर या विषयावर भाष्य करणे चुकीचे तसेच झालेली घटना दुर्दैवी असल्याचे मत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ रुग्णालयावर आरोप होत आहे. रुग्णालयाकडून भिसे कुटुंबीयाकडे १० लाख रुपये अनामत रक्कम (डिपॉझिट) मागण्यात आले. याबाबत रुग्णालयाच्या संचालकांनी, डॉ घैसास यांच्या डोक्यात काय राहू केतू आला की त्यांनी दहा लाख डिपॉझिट लिहिल असे माध्यमांशी बोलताना नमूद केले होते. याच विषयावर भुजबळ यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आपले मत व्यक्त केले.
भुजबळ म्हणाले, ” यावर मी भाष्य करणे योग्य नाही सरकारने याबाबत समिती नेमली आहे. एका समितीने अस देखील सांगितले आहे की धर्मादाय रुग्णालयाकडे ३७ लाख रु शिल्लक आहे. तसेच डॉ. केळकर यांनी देखील कबूल केले की दहा लाख रुपये डिपॉझिट मागितले गेले. डॉक्टर झाल्यावर सर्वात पहिले डॉक्टरांना हाच धडा दिला जातो की लोकांची सेवा केली पाहिजे. जी काही घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी असून यावर कारवाई होईल.”

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन