December 13, 2024

तरुणीस लग्नासाठी आत्महत्येची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे, १२/०४/२०२३: आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करून आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश दशरथ गायकवाड( रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार जानेवारी ते मार्च 2023 यादरम्यान जंगली महाराज रोड येथील मॅक इन्स्टिट्यूट या ठिकाणी घडला आहे. आरोपी सोबत 2015 मध्ये मॅक इन्स्टिट्यूट येथे ॲनिमेशन क्लास करत असताना, तरुणीची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी सदरचे काम सोडून दिल्यानंतर, त्यानी तरुणीचा मोबाईल नंबर कुठून तरी शोधून काढून त्यावर कॉल करून’ तू मला आवडतेस, तू माझी हो ,माझ्याशी लग्न कर ,तू माझी नाही झालीस तर मी आत्महत्या करेल’ असा धमकीचा मेसेज करून तिच्या व्हाट्सअप मेसेजवर वारंवार मेसेज करून तिचा पाठलाग करत होता.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहे.