पुणे, १३/०४/२०२३: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शहर परिसरातील अनुयायांची गर्दी होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी वाहतूक बदल करण्यात येणार असून या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहीर अमर चौकातून वळविण्यात येणार आहे. शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या वाहने आरटीओ चौक, जहाँगीर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
जीपीओ चौकातून बोल्हाई माता चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. जीपीओ चौकातून बोल्हाई माता चौक तसेच मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चाैकातून वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पुणे स्टेशन, अलंकार चित्रपटगृमार्गे इच्छितस्थळी जावे.
सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चाैक, कुंभारवेस चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. बॅनर्जी चौकातून पाॅवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. जिल्हाधिकारी चौक परिसरातील वाहतूक बदल गर्दी ओसरेपर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येणाऱ्या अनुयायांसाठी वाहने लावण्याची व्यवस्था आरटीओ कार्यालय, एसएसपीएमएस मैदान, पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून काॅलनी येथे करण्यात आली आहे.
लष्कर, विश्रांतवाडी भागात वाहतूक बदल
लष्कर भागातील अराेरा टाॅवर्स परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होते. या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. विश्रांतवाडीतील चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातून मिरवणूक काढण्यात येत असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दांडेकर पूल चौकात आज रात्री वाहतूक बदल
सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल चौकातील विविध मंडळांकडून डाॅ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. गुरुवारी (१३ एप्रिल) रात्री आठनंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. गर्दी ओसरेपर्यंत दांडेकर पूल परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन