पुणे, 17 जुन 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघाविरुद्ध विजयानंतर ईगल नाशिक टायटन्स आज रविवारी, १८ जुन २०२३ रोजी सोलापूर रॉयल्स विरुद्ध दुपारी २ वाजता होणार आहे. तर, दुसरा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघाविरुद्ध रात्री आठ वाजता होणार आहे.
याआधी ईगल नाशिक टायटन्स संघाने छत्रपती संभाजीनगर किंग्जविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ४ धावांनी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली. तर दुसरीकडे सोलापूर रॉयल्स संघाला रत्नागिरी जेट्सकडून ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सोलापूर रॉयल्स संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.
सोलापूरचा कर्णधार सत्यजीत बच्चाव म्हणाला की, आमच्या संघाच्या कामगिरीवर मी समाधानी असून पावसाच्या व्यत्ययामुळे थोडासा परिणाम झाला. पण त्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही. खेळाडू चांगल्या सरावात आहेत, प्रशिक्षक चामुंडा वास यांनी आमची चांगली तयारी करून घेतलीआहे. त्यामुळे या सामन्यात आमच्या संघाकडून चांगली होईल, असा मला विश्वास वाटतो.
ऋतुराजच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा
आयपीएल आणि भारतीय संघाचा अनुभव असल्यामुळे उद्या पुन्हा एकदा ऋतुराजच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. पहिल्या सामन्यात तडाखेबंद खेळी करून आपल्या उपस्थित प्रेक्षकांना आकर्षित केले होते व त्यामुळे तो पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करेल.
पहिल्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघातील ऋतुराज व पवन शहा या सलामीच्या जोडीची फलंदाजी बघता छत्रपती संभाजीनगर किंग्जच्या गोलंदाजासमोर त्यां

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय