September 17, 2024

सहाव्या स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत 130 एकुण खेळाडू सहभागी

पुणे, 8 जुलै, 2023: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित सहाव्या स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातून एकूण 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे रविवार, 9 जुलै 2023 रोजी होणार आहे.
 
प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.स्पर्धेत एकूण  130  खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये  अ गटात(रेटेड व 1201वरील रेटेड खेळाडू) आणि ब गटात (1000 व 1200 मधील रेटेड खेळाडू) अशा दोन गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेला स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांनी 17500/-रुपयांचे प्रायोजकत्व दिले आहे.    
   

स्पर्धेत सहभागी मानांकित खेळाडूंमध्ये अ गटात आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, एफएम सोहम फडके, सौरभ म्हामने यांचा तर, ब गटात विश्वजीत जाधव, श्रद्धा पावडेकर आणि ऋषिकेश देवडीकर यांचा समावेश आहे. चीफ आरबीटर आयए विनिता क्षोत्री आणि डेप्युटी चीफ आरबीटर एफए श्रद्धा विचवेकर हे काम पाहणार आहे. 

 
स्पर्धेचे उदघाटन सिबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे माजी संचालक डॉ. सतीश ठिगळे आणि हर्षल लेले यांच्या हस्ते 9 जुलै 2023 ररोजी सकाळी 9.00 वाजता  सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे करण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धेची पहिली फेरी सुरू होणार आहे. या उदघाटन प्रसंगी 2023 या शैक्षणिक वर्षात मानांकित खेळाडू श्रावणी हरपुडे, धनश्री खैरमोडे आणि मिहीर सरवदे यांनी मिळवलेल्या प्राविण्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.