November 7, 2024

पहिल्या केसीए पुणे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत 180हून खेळाडू सहभागी

पुणे, 15  जुलै, 2023: कुंटे चेस अकादमी यांच्या वतीने आयोजित पहिल्या केसीए पुणे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातून 180 हून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा श्री गणेश सभागृह, कर्वेरोड येथे रविवार, 16 जुलै 2023 रोजी होणार आहे.
 
स्पर्धेच्या संचालिका मृणालिनी कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.स्पर्धेत 180 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये अ गटात (खुला गट) आणि ब गटात (12 वर्षाखालील) अशा दोन गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 20000/-रुपयांची पारितोषिके प्रदान  करण्यात येणार आहेत.    
   

स्पर्धेत सहभागी मानांकित खेळाडूंमध्ये अ गटात सौरभ म्हामने(1755),विरेश शरणार्थी(1749), सिद्धांत ताम्हणकर(1747), निर्गुण केवल(1687), आर्यन सिंगला(1666) यांचा तर, ब गटात ईशान अर्जुन पीवाय(1248),विहान देशमुख(1225),आरीव कामत(1130),वेदांत काळे(1072)यांचा समावेश आहे. चीफ आरबीटर नितीन शेणवी हे काम पाहणार आहे. स्पर्धेत खुल्या गटातील विजेत्या खेळाडूला करंडक व 12,500/- रुपये, तर 12वर्षाखालील गटातील विजेत्या खेळाडूला करंडक व 7,500/- रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.