June 14, 2024

“स्वप्नवासवदत्तम्” मधून उलगडणार प्रेम, सत्ता आणि स्वप्नाची एक अनोखी कथा

पुणे, २८ मार्च २०२३ : सौन्दर्य, कला, प्रेम, राजनीति आणि देशभक्ती अशा विविध पैलूंना स्पर्श करणारी एक अनोखी कथा स्वप्नवासवदत्तम् या नाटकाच्या माध्यमातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या नाटकाचा प्रयोग शनिवार, एक एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता एमआयटी कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृह येथे होणार आहे.

मेधा फाऊंडेशन प्राचीन भारतीय अभिजात साहित्याला नवीन रूपात मांडण्याचा प्रयत्न केला जात असून, याच प्रयत्नांतर्गत महाकवी भास यांनी लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तम् या संस्कृत नाटकावर हा प्रयोग आधारित आहे. गीत, काव्य, नृत्य, नाट्य अशा विविध गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे.

या नाटकाची संकल्पना, प्रस्तुती आणि दिग्दर्शन कथक नृत्यांगना मुग्धा पोतदार पाठक यांनी आपल्या प्रॉडक्शन हाऊस कथा बिरादरी’च्या माध्यमातून केले आहे. मूळ नाटकाचे हिन्दी काव्य, नाट्य, गीत रचना रूपांतर प्रख्यात विद्वान डॉ. सुनील देवधर यांनी केले आहे. रंगमंच व्यवस्था राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम भूतकर यांची आहे तर संगीत निखिल महामुनी आणि आमोद कुलकर्णी यांचे आहे.