पुणे, 16 सप्टेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी व सोलींको प्रायोजित 12, 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए मानांकन महाराष्ट्रीय मंडळ ओपन ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत आदित्य उपाध्ये, आरव बेले, आदित्य वाडकर, रेयांश गुंड यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत आदित्य उपाध्ये याने रयान साबळेचा टायब्रेकमध्ये 6-5(4) असा संघर्षपूर्ण पराभव केला. अव्वल मानांकित आरव बेलेने भार्गव दाभोळेचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. अकराव्या मानांकित रेयांश गुंडने प्रांशुल पुजारीचे आव्हान 6-4 असे मोडीत काढले. अश्वथ भुजबळने रेयांश शर्माचा 6-1 असा सहज पराभव करून तिसरी फेरी गाठली.
अद्वैत मुधोळकर व आदित्य वाडकर यांनी अनुक्रमे अर्जुन पाटोळे व अहान भट्टाचार्य यांचा 6-2 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. पंधराव्या मानांकित अगस्त्य तापकीरने विहान सक्सेनाला 6-2 असे पराभूत केले. याआधी स्पर्धेचे उदघाटन एमएमएलटीएचे संचालक विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक धरणीधर मिश्रा आणि पीएमडीटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 12 वर्षाखालील मुले:
आरव बेले(1)वि.वि.भार्गव दाभोळे 6-0;
श्लोक कारे वि.वि.बलराज बिराजदार 6-4;
अश्वथ भुजबळ वि.वि.रेयांश शर्मा 6-1;
अगस्त्य तापकीर(15)वि.वि.विहान सक्सेना 6-2;
रेयांश गुंड(11)वि.वि.प्रांशुल पुजारी 6-4;
अद्वैत मुधोळकर वि.वि.अर्जुन पाटोळे 6-2;
आदित्य वाडकर वि.वि.अहान भट्टाचार्य 6-2;
दिवित गोसावी(7)वि.वि.अर्णव भट्ट 6-3;
अर्णव पांडे(4) वि.वि.अरिन कोटणीस 6-4;
भाग्यांश ढोणे वि.वि.विआन पेंडुरकर 6-4;
गौतम त्रिपाठी वि.वि.शौर्य सूद 6-2;
आयुष मिश्रा(10)वि.वि.नील पांडे 6-1;
आदित्य उपाध्ये वि.वि.रयान साबळे 6-5(4).

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय