October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पीएमडीटीए मानांकन महाराष्ट्रीय मंडळ ओपन ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2023 स्पर्धेत 150 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 15 सप्टेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी व सोलींको प्रायोजित 12, 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए मानांकन महाराष्ट्रीय मंडळ ओपन ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 16 व 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

स्पर्धा संचालक धरणीधर मिश्रा यांनी सांगितले की, स्पर्धेत जिल्ह्यांतून एकूण 150 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलीच्या गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
12 वर्षांखालील मुले: 1.आरव बेले, 2.अद्वैत गुंड, 3.नील देसाई, 4.अर्णव पांडे, 5.पार्थ दाभिकर, 6.सोहम रणसुभे, 7.दिवित गोसावी, 8.अनय सुमंत;

12 वर्षाखालील मुली: 1. वीरा हरपुडे, 2. ओवी मारणे, 3. जान्हवी सावंत, 4. रिशिता यादव, 5. मोहक कुलकर्णी, 6. कनिष्का सिंग, 7. गौरी बगाडे, 8. सान्वी गोसावी;

14 वर्षांखालील मुली: 1.मायरा टोपनो, 2.वीरा हरपुडे, 3.प्रार्थना खेडकर, 4.अवंतिका सैनी, 5.मृदुला साळुंखे, 6. अँजेला रे, 7. सौम्या कुमार, 8. झैनाब हकीम;

14 वर्षांखालील मुले: 1.प्रजीतरेड्डी मदिरेड्डी, 2.सनत कडले, 3.नीरज जोर्वेकर, 4.क्रिशय तावडे, 5.आश्रित मज्जी, 6.किशल्या शर्मा, 7.अंशुल पुजारी, 8.रुद्र मेमाने