July 24, 2024

एडीपी पुणे यांनी पुण्यातील आपल्या कार्यकाळाची 16 वर्षे आणि भारतातील उत्कृष्टतेची 24 वर्षे केली साजरी

पुणे, 27 ऑगस्ट 2023: मनुष्यबळ व्यवस्थापन सॉफ्टवेअर व सेवा क्षेत्रातील आघाडीचे पुरवठादार असलेल्या एडीपी इंडियाने पुण्यातील जेडब्ल्यू मॅरिअटमध्ये उत्साहात व जोशात वर्धापन दिन साजरा केला. कंपनीचा लक्षणीय प्रवास व आतापर्यंत केलेल्या अविरत प्रगतीचा जल्लोष साजरा करण्यासाठी एडीपीचे 1300 एसोसिएटेस व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ‘लीड टू विन: एम्प्रेस द फ्युचर’ ही या सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना होती. एडीपीतर्फे याच संकल्पनेवर आधारित अनेक सांस्कृतिक, इमर्सिव्ह ॲक्टिव्हिटींचे आयोजन करण्यात आले होते.यात नाट्य सादरीकरणे, पारंपरिक महाराष्ट्रीय ढोल ताशा, लाइव्ह सांगीतिक सादरीकरणांचा समावेश होता. विविध प्रकारची नृत्ये आणि मनोरंजक सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि खिळवून ठेवले.

1999 मध्ये 102 असोसिएट्सनी भारतातील कामकाजाची सुरुवात केली आणि 7 वर्षांनी 2007 मध्ये एडीपीने पुण्यात त्यांचे प्रोडक्ट डेव्हलपमेंट व आयटी एनेबल्ड सर्व्हिसेसचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर 16 वर्षांनी एडीपीची पुण्यात प्रचंड वाढ झाली. आता त्यांचे एकूण 3,300 असोसिएट्सचे आणि भारतभरात एकूण 11,000 असोसिएट्सचे कुटुंब आहे. एडीपी आपल्या प्रत्येक असोसिएट आणि क्लाएंटबद्दल अत्यंत समाधानी आहे. या खास औचित्याने एडीपी इंडियाने आधीपासूनच त्यांच्या पुण्याच्या कार्यालयात सोहळा साजरा केला होता. यात डिजिटल गेम्स, बायसिकल बॉट्स, सेल्फी बूथ्स आणि असोसिएट्समध्ये उत्कंठा निर्माण करण्यासाठी त्यांच्या डिजिटल मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित अनेक उपक्रम आयोजित केले होते.

या सोहळ्याचा आनंद व्यक्त करताना एडीपी प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक व महाव्यवस्थापक श्री. विजय वेमुलापल्ली म्हणाले, “भारतातील ही 24 वर्षे व पुण्यातील 16 वर्षे एडीपीकरांनी साकारली आहेत. या आमच्या सगळ्या माणसांच्या नावीन्याची कास धरण्याच्या वृत्तीमुळे व प्रगती करण्याच्या दुर्दम्य इच्छेमुळे तंत्रज्ञान व सेवा क्षेत्रात आम्ही सातत्याने यश प्राप्त केले आहे. हा महत्त्वाचा टप्पा एडीपीचा सोहळा आमच्या माणसांसाठी व मूल्यांसाठी एक संस्मरणीय व्हावा अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच,प्रत्येक असोसिएटची आणि एडीपीच्या प्रगतीमधील त्यांच्या योगदानाची दखल घेतली जावी याची खातरजमा या सोहळ्यात करण्यात आली! हा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना, आम्ही ‘लीड टू विन’साठी आणि आमच्या एडीपी कुटुंबासाठी सहाय्यक, सर्वसमावेशक व प्रगतीशील कार्य वातावरणाची निर्मिती करण्यासाठी आधीपेक्षाही जास्त वचनबद्ध आहोत. पुढील वाटचालीसाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत आणि व्यवसायाच्या यशाला चालना देणाऱ्या नावीन्यपूर्ण उपाययोजना पुरविण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.”

या संध्येच्या निमित्ताने या प्रचंड संख्येने उपस्थित प्रेक्षकांना एकमेवाद्वितीय एडीपी कराओकेचा अनुभव देण्यात आला आणि एडीपी स्टुडियो या कंपनीच्या म्युझिक ग्रुपच्या ‘रेट्रो टू मेट्रो’ म्युझिकल मेडलीने उपस्थित खूश झाले. या साग्रसंगीत सोहळ्यामध्ये एडीपीच्या थिएटर ग्रुपने महाभारतावर आधारित सादरीकरण केले. त्यानंतर एडीपी असोसिएट्स व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामुहिक ढोल ताशा वादन केले. एडीपी असोसिएट्च्याभविष्यवेधी व बॉट्स-थीमवरील नृत्य सादरीकरणाने सगळ्यांची मने जिंकली. त्याचप्रमाणे एडीपी इंडियाच्या ‘तरंग’ या सीएसआर प्रोग्रॅमच्या गुणवंत मुलांनी केलेले सादरीकरण हे या सोहळ्याचे अजून एक आकर्षण होते. त्याचप्रमाणे, विविध टीम्सनी त्यांचे अत्यंत प्रभावशाली टेक प्रोजेक्ट अधोरेखित केले. वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा करून एकमेवाद्वितीय प्रात्यक्षिक अशा स्वरुपात प्रोजेक्टचे सादरीकरण केले. या निमित्ताने नावीन्यपूर्ण एडीपी प्रकल्पांचा तपशील अभ्यागतांना देऊन त्यांना खिळवून ठेवलं. जोशपूर्ण डीजे व भव्य भोजन समारंभाने या कार्यक्रमाची सांगता झाली.