पुणे, 5 सप्टेंबर 2023: अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित व अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत अंतरा बिस्वास, रॉबिन तुशीर, आधिदेव प्रदीप, बालाजी कृष्ण, अक्षिता मुखर्जी, ऐश्वर्या गुप्ता या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या एनईसीसी, वेंकीज, व्हेनकॉब आणि ब्रिजस्टोन यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत 50मीटर बाय-फिन्स मास्टर वी महिला गटात पश्चिम बंगालच्या अंतरा बिस्वास(00:31: 05सेकंद)वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. पश्चिम बंगालच्या ऋतू बॅनर्जी (00:32: 24सेकंद) चंदीगडच्या प्रीती बाघेल(00:38: 10सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
50मीटर बाय-फिन्स मास्टर वी पुरुष गटात हरयाणाच्या रॉबिन तुशीर(00:25: 28सेकंद) वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर, 50मीटर बाय-फिन्स मास्टर वी1 महिला गटात पश्चिम बंगालच्या ऐश्वर्या गुप्ता(00:31: 80सेकंद) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
50मीटर बाय-फिन्स ज्युनियर क मुलांच्या गटात केरळच्या आधिदेव प्रदीप(00:24: 80सेकंद) वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. 50मीटर बाय-फिन्स ज्युनियर ड मुलांच्या गटात केरळच्या बालाजी कृष्ण(00:23: 93सेकंद) याने विजेतेपद पटकावले. मणिपूरच्या बुद्धचंद्र नोंगथोम्बम(00:24: 63सेकंद)वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. 50मीटर बाय-फिन्स ज्युनियर ई मुलींच्या गटात पश्चिम बंगालच्या अक्षिता मुखर्जी (00:29: 29सेकंद) वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना खेळाडूंना पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे अध्यक्ष अनिल दिप मेहेल, साई कोचचे प्रशिक्षक आर के सिंग, अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ केरळचे सहसचिव अर्चना उन्नीकृष्णा, अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ पश्चिम बंगालचे खजिनदार आशिष सरकार, कर्नाटक संघाचे इन्चार्ज दिक्षित राव, अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन ऑफ आंध्रप्रदेशचे सचिव बालाजी पाला आणि अंडरवॉटर स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार अचंता पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार:
50मीटर बाय-फिन्स ज्युनियर क मुले:
1.आधिदेव प्रदीप(केरळ, 00:24: 80सेकंद), 2.अक्षय SD(केरळ, 00:24: 90सेकंद), 3.आभरा मेतिया (पश्चिम बंगाल, 00:24:96सेकंद);
50मीटर बाय-फिन्स ज्युनियर ड मुले:
1.बालाजी कृष्ण(केरळ, 00:23: 93सेकंद), 2.बुद्धचंद्र नोंगथोम्बम(मणिपूर, 00:24: 63सेकंद); 3.दत्तराज नाईक(गोवा, 00:25: 82सेकंद);
50मीटर बाय-फिन्स ज्युनियर ई मुली:
1.अक्षिता मुखर्जी (पश्चिम बंगाल, 00:29: 29सेकंद), 2.अशविथा व्ही(तमिळनाडू, 00:30: 00सेकंद), 3.नावेद्या नितिन(केरळ, 00:30: 59सेकंद);
50मीटर बाय-फिन्स ज्युनियर ई मुले:
1.अंगशुमन नाग(पश्चिम बंगाल, 00:29: 12सेकंद), 2.अश्वत अय्यालासोमयाजुला(तेलंगणा, 00:29: 41सेकंद), 3.जोहान पीजे(केरळ, 00:29: 44सेकंद);
50मीटर बाय-फिन्स मास्टर वी महिला:
1.अंतरा बिस्वास (पश्चिम बंगाल, 00:31: 05सेकंद), 2.ऋतू बॅनर्जी (पश्चिम बंगाल, 00:32: 24सेकंद), 3.प्रीती बाघेल (चंदीगड, 00:38: 10सेकंद);
50मीटर बाय-फिन्स मास्टर वी पुरुष:
1.रॉबिन तुशीर(हरयाणा, 00:25: 28सेकंद), 2.किसम उलेन(मणिपूर, 00:26: 90सेकंद), 3.वरुण रमेश (तमिळनाडू, 00:26: 96सेकंद);
50मीटर बाय-फिन्स मास्टर वी1 महिला:
1.ऐश्वर्या गुप्ता(पश्चिम बंगाल, 00:31: 80सेकंद), 2.मिथू मेतीया(पश्चिम बंगाल, 00:34: 57सेकंद), 3.समीक्षा चौरसिया (महा, 00:38: 17सेकंद).
More Stories
पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत राहुल क्रिकेट अकादमी, पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी संघांचे विजय
एमएसएलटीए भारती विद्यापीठ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकूण 134 खेळाडू सहभागी
अखिल भारतीय एसएनबीपी स्पर्धेत १५ राज्यांचा सहभाग