July 24, 2024

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला दुहेरी मुकुट

पुणे, 4 सप्टेंबर 2023 ः पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्ये याने 19 व 17 वर्षाखालील दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला., तर मुलींच्या गटात राधिका सकपाळ हिने विजेतेपद पटकावले.

पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात 17 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित राधिका सकपाळने अव्वल मानांकित आनंदिता लुनावतचा 11-08, 11-07, 11-08 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळविले. राधिका ही अशोका विद्यालय मध्ये विज्ञान शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून भुषण ठाकुर हाय परफॉर्मन्स सेंटर येथे प्रशिक्षक भुषण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित आनंदिता लुणावतने चौथ्या मानांकित सई कुलकर्णीचा 11-03, 11-13, 04-11, 11-04, 11-08 असा तर, तिसऱ्या मानांकित राधिका सकपाळने वेदांगी रेवस्करचा11-03, 11-04, 11-06 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली

मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित नील मुळ्येने तिसऱ्या मानांकित प्रणव घोळकरचा 06-11, 13-11, 14-12, 11-08 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. नील हा डॉ.कलमाडी हायस्कूल मध्ये अकरावी ईयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

15 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित श्रेयस माणकेश्वरने सहाव्या मानांकित इशान खांडेकरचा 11-09, 08-11, 11-06, 11-08 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
नील मुळ्ये(1)वि.वि.शौरेन सोमण(4) 11-09, 11-04, 10-12, 11-03;
प्रणव घोळकर(3)वि.वि.कौस्तुभ गिरगावकर(2) 11-08, 11-08, 11-13, 11-09
अंतिम फेरी: नील मुळ्ये(1)वि.वि.प्रणव घोळकर(3) 06-11, 13-11, 14-12, 11-08

17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी
आनंदिता लुणावत(1)वि.वि.सई कुलकर्णी(4) 11-03, 11-13, 04-11, 11-04, 11-08;
राधिका सकपाळ(3)वि.वि.वेदांगी रेवस्कर 11-03, 11-04, 11-06;
अंतिम फेरी: राधिका सकपाळ(3)वि.वि.आनंदिता लुनावत(1) 11-08, 11-07, 11-08;

15 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
कौस्तुभ गिरगावकर(2)वि.वि.स्वरूप भाडळकर(7) 10-12, 11-05, 11-05, 11-07;
शौरेन सोमण(1)वि.वि.अश्विन कुमारगुरु(8) 11-09, 11-06, 12-10;
आदित्य सामंत(4)वि.वि.रामानुज जाधव 05-11, 11-09, 11-06, 05-11, 11-07;
श्रेयस माणकेश्वर वि.वि.इशान खांडेकर(6)11-09, 08-11, 11-06, 11-08;

13 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
आद्य गावत्रे(2)वि.वि.सारा गांधी 11-04, 11-08, 11-04;
दिया शिंदे वि.वि.नीरुआ देशमुख 11-07, 11-09, 07-11, 11-05;
कालिका आठवले वि.वि.स्पृहा बोरगावकर 11-06, 12-10, 11-04;
मृदुला सुरवसे(4)वि.वि.मेधा कोत्रा 11-09, 11-02, 11-03.