पुणे, 14 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गटसाखळी फेरीत एमडब्लूटीए 1, पीवायसी एसेस, लॉ कॉलेज लायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गट 1मध्ये राजेंद्र साठे, केदार देशपांडे, संग्राम पाटील, तुषार नगरकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी एसेस संघाने महाराष्ट्र मंडळ 2 संघाचा 19-18 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. गट 3मध्ये लॉ कॉलेज लायन्स संघाने पीवायसी कॅनन्सचा 24-02 असा पराभव केला. विजयी संघाकडून केतन जठार, संतोष जयभाई, प्रशांत जुटले, शिवाजी यादव, केतन जठार, तारीक पारेख, श्रीराम ओक, अभिजित मराठे यांनी सुरेख कामगिरी केली. अन्य लढतीत एमडब्लूटीए 1 संघाने ओडीएमटी नटराजियन्स संघावर 24-06 असा विजय मिळवला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन आयएएस श्रवण हार्डीकर, इन्स्पेकटर जनरल रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प, पुणे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)चे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, हिमांशु गोसावी, हेमंत बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट 1: पीवायसी एसेस वि.वि. महाराष्ट्र मंडळ 2 19-18(100 अधिक गट: हनिफ मेमन/संजय बोथरा पराभुत वि.अर्जुन वाघमारे/प्रशांत संघवी 2-6; 90 अधिक गट: राजेंद्र साठे/केदार देशपांडे वि.वि.विशाल पटेल/रुपेश कोठारी 6-4; खुला गट: संग्राम पाटील/तुषार नगरकर वि.वि.शीतल बलदोटा/पंकज सेठिया 6-2; खुला गट: अजिंक्य मुठे/अंकुश मोघे पराभुत वि.संदीप चडियार/सचिन देसरडा 5-6);
गट 2: एमडब्लूटीए 1 वि.वि.ओडीएमटी नटराजियन्स 24-06(100अधिक गट: राजेश मंकणी/गजानन कुलकर्णी वि.वि.वसंत साठे/ऋषिकेश अधिकारी 6-0; 90 अधिक गट: पार्थ मोहापात्रा/संजय आशर वि.वि.किरण तावरे/उमेश दळवी 6-2; खुला गट: विवेक खडगे/आशिष मणियार वि.वि. हर्षवर्धन खुर्द/तेजस पोळ 6-1; खुला गट: प्रफुल्ल नागवाणी/संतोष शहा वि.वि.अमर बिडकर/मानस खारकर 6-3);
गट 3: लॉ कॉलेज लायन्स वि.वि. पीवायसी
कॅनन्स 24-02 ( 100 अधिक गट: केतन जठार/संतोष जयभाई वि.वि.विनायक भिडे/हरीश गलानी 6-0; 90अधिक गट: प्रशांत जुटले/शिवाजी यादव वि.वि. शितल अय्यर/शंकर 6-0; खुला गट: केतन जठार/तारीक पारेख वि.वि. राहुल रोडे/रवी आर 6-0; खुला गट: श्रीराम ओक/अभिजित मराठे वि.वि.देवेंद्र चितळे/चिन्मय चिरपुटकर 6-2).
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन