पुणे, २५ जुलै २०२४ : मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या काट चा भाग पाण्यात बुडवल्याने पुण्यात हाहाकार उडाला आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या पावसामुळे दाणादाण वाढलेली असताना पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबईत थेट पुणे गाठली आणि परिस्थितीचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कुठे आहेत असे टीका होत असताना दिल्लीवरून मुरलीधर मोहोळ पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. ते देखील आढावा आणि प्रत्येक भेटीवर भर देणार आहेत.
खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणातून 35556 क्युसेक पाणी नदीमध्ये सोडले. तसेच धरणाच्या खालच्या भागात किरकटवाडी, शिवणे, कोपरे, धायरी, आंबेगाव, वारजे, उत्तम नगर या भागात देखील जोरदार पाऊस झाल्याने नदीची पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा फटका नदीकाठच्या वस्तीमध्ये बसलेला आहे. सिंहगड रस्ता भागात शेकडो घरांमध्ये पाणी घुसले तर वारजे येथे गोठ्यातील पंधरा जणावरे पाण्यात बुडून मृत्यु पडली. त्याचप्रमाणे पुलाची वाडी, पाटील इस्टेट येथे देखील घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणखीन जास्त पाऊस होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतून आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते काही वेळातच खास विमानाने पुण्यामध्ये दाखल झाले. पोलीस आयुक्तालय, पुणे महापालिकेत त्यांनी आढावा बैठक घेतली त्यानंतर थेट त्यांनी सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी येथे जाऊन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.
पुण्यामध्ये अजित पवार सक्रिय झालेले असताना दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कुठे आहेत असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित झाला? विरोधी पक्षांनी मोहोळ यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत मोहोळ दिल्लीमध्ये मौज मजा करत आहेत अशी बोचरी टीका केली. त्यामुळे मोहोळ यांनी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे. मोहोळ दिल्लीहून अधिवेशन सोडून पुण्याकडे रवाना झाले असून, पावसाची स्थिती आणि हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन मोहोळ पुण्याकडे येत आहेत. पूरग्रस्त भागाचा आढावा, संगमवाडी, पाटील इस्टेट, पुलाचीवाडी आणि सिंहगड रस्ता परिसर आणि महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षालाही भेट देणार आहेत.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी