July 25, 2024

बीपीसीएलतर्फे ई-वाहनांच्या फास्ट- चार्जिंगसाठी ६ हायवे कॉरिडॉर्स लाँच

पुणे, १६ मार्च २०२३ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने आज भारतातील पश्चिम भागातील सहा महामार्गांवर ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन्स लाँच करत असल्याची घोषणा केली. हे महामार्ग पुढीलप्रमाणे आहेत –

पुणे- अहमदनगर- औरंगाबाद, २४० किमी

पुणे- सोलापूर (४ आरओज), २५० किमी

पुणे- नाशिक (४ आरओज), २०० किमी

पुणे- कोल्हापूर (३ आरओज), २२५ किमी

मुंबई- नाशिक (३ आरओज), २०० किमी आणि

नाशिक- शिर्डी (३ आरओज) ९० किमी

 

बीपीसीएल फ्युएल स्टेशन्सवरील ईव्ही फास्ट चार्जर्स केवळ ३० मिनिटांत ईव्ही रिचार्ज करत असल्यामुळे १२५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते व पर्यायाने महामार्गावरील अशा दोन सुविधांवरील अंतर १०० किमीच्या आत ठेवण्यात आले आहे. 

 

आतापर्यंत बीपीसीएलने ६ महामार्गांचे इलेक्ट्रिक कॉरिडॉर्समध्ये रुपांतर केले असून ३१ मार्च २०२३ पर्यंत २०० महामार्गांवर इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग कॉरिडॉर्स क्लीन.फास्ट.ईझी अशी टॅगलाइन असलेल्या ईड्राइव्ह ब्रँडअंतर्गत उभारले जाणार आहेत. त्याद्वारे देशातील ईव्हीच्या वापराला चालना दिली जाणार आहे.

 

या फास्ट चार्जिंग कॉरिडॉर्सचे उद्घाटन श्री. पी. एस. रवी, कार्यकारी संचालक इनचार्ज (रिटेल) यांच्या हस्ते आणि एस. अब्बास अख्तर, सीजीएम (ब्रँड आणि पीआर), शुभांकर सेन सीजीएम (रिटेल इनिशिएटिव्हज आणि ब्रँड)रिटेल मुख्यालयअक्षय वाधवा प्रमुख (रिटेल)पश्चिम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

बीपीसीएलतर्फे उभारण्यात येत असलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचा हा सहावा आणि पश्चिम भागातील या पहिला टप्पा आहे. फास्ट चार्जर्स सीसीएस-२ प्रोटोकॉलचे पालन करतात आणि तो इलेक्ट्रिक वाहनचालकांना रेंजविषयी वाटणाऱ्या चिंतेवर समाधान मिळवून देण्याच्या बीपीसीएलच्या उपक्रमाचा भाग आहे.

 

लाँचप्रसंगी बीपीसीएलचे कार्यकारी संचालक आय/सी (रिटेल) श्री. पी. एस. रवी म्हणाले, बीपीसीएलमध्ये आम्ही सातत्याने देशाच्या वाहनांचे हरित पर्याय पुरवण्याच्या तसेच जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाशी सुसंगत काम करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही कंपनीच्या ७००० पारंपरिक रिटेल दालनांचे एनर्जी स्टेशन्समध्ये रुपांतर करण्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. हा आमच्या शाश्वत उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या आणि सर्वसमावेशक डीकार्बनायझेशन धोरणाचा एक भाग आहे. महामार्गावर प्रवास करताना ईव्ही ग्राहकांना जाणवणारी रेंज, डिस्कव्हरी आणि वेळेची चिंता कमी करण्यासाठी आम्ही फास्ट चार्जिंग स्टेशन्सची स्थापना करत आहोत. अशाप्रकारचे ४०० कॉरिडॉर्स पुढील वर्षापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात उभारले जातील.    

 

सर्व ईव्ही ग्राहकांना पे- पर- युज ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन्स सुविधा वापरता येणार आहे. फार्स्ट चार्जर्स कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय वापरता येणार असून गरज पडल्यास सपोर्ट स्टाफची मदत घेता येईल.

 

भारत पेट्रोलियम फ्युएल स्टेशन्स ग्राहकांना स्वच्छ वॉशरूम्स, पैसे काढण्याची सोय, चार्जिंग करता सुरक्षित पार्किंग, मोफत डिजिटल एयर सुविधा, २४ तास चालणारे कामकाज इत्यादी सुविधा पुरवते. निवडक फ्युएल स्टेशन्सवर नायट्रोजन फिलिंग सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. बीपीसीएलने HelloBPCL अपच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ व पारदर्शक ऑनलाइन अनुभव देण्याच्या हेतूने संपूर्ण ईव्ही चार्जर लोकेटर, चार्जर ऑपरेशन्स आणि व्यवहार प्रक्रिया डिजीटाइज केली आहे.

 

काही भारत पेट्रोलियम हायवे फ्युएल स्टेशन्सवर मॅकडोनाल्ड्स, ए2बी, कॅफे कॉफी डे आणि इतर स्थानिक दालनांशी झालेल्या धोरणात्मक सहकार्यातून जेवणाची सुविधाही दिली जाते. भारत पेट्रोलियमने ग्राहकांच्या सोयीसाठी महामार्गांवरील महत्त्वाच्या फ्युएल स्टेशन्सवर इन अँड आउट कन्व्हिनियन्स स्टोअर्सही सुरू केली आहेत.