September 17, 2024

केंद्र व राज्य सरकार यांनी कामगार विरोधी धोरण मागे घ्यावे – भारतीय मजदूर संघ

पुणे, २६/०४/२०२३: केंद्र व राज्य सरकारची सध्या ची धोरणे पुर्ण पणे कामगार विरोधी असून सदरची धोरणे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने मा जिल्हाधिकारी पुणे कार्यालया समोर झालेल्या निर्दशने करून निवेदन देण्यात आले.

शासनाने कामगार विरोधी तरतूदी मागे न घेतल्यास रस्ता वर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी, व उद्योग प्रभारी चंद्रकांत धुमाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे दिला आहे.

भारतीय मजदूर संघाने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांचे ज्वलंत प्रश्न ,कंत्राटी कामगारांचे होणारे पिळवणूक शासनाकडे मागण्या करिता, प्रलंबित किमान वेतनाच्या वाढी करिता, आंगणवाडी, आशा वर्कर्स, घरेलु कामगार, बांधकाम कामगारांना आर्थिक लाभ ई मागण्या घेवून शिवनेरी ते आझाद मैदान अशी चेतना यात्रा व हजारो कामगारांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. पण यांची दखल घेतली नाही. त्यामुळे भारतीय मजदूर संघाचे २०वे त्रैवार्षीक अधिवेशन पाटणा बिहार येथे ७ ते ९ एप्रिल २३ रोजी संपन्न झाले. या अधिवेशनात देशभरातील ५५० जिल्हा मधून २५०० पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी चार ठराव पारित करण्यात आले. सदरील ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी देशातील जिल्हा स्थानी निदर्शने करून ठरावाच्या प्रती मा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण मागण्या
1) सर्व संघटित व असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा लागू करा.
2) कंत्राटीकरण, खाजगीकरण, निगमीकरण,इ त्वरित थांबविण्यात येवुन या ठिकाणी कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत मध्ये समाविष्ट करावेत .
3) किमान वेतन च्या ऐवजी जिवन वेतन( Living wage) लागु करा
4) देशाच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय श्रम निती तयार करा
5) ई पी एफ मधील सभासदांना दरमहा रू 5000 (पाच हजार) व महागाई भत्ता देण्यात यावे.
6) केंद्र व राज्य सरकार मधील कर्मचारी ना जुनी पेंशन योजना लागु करावी
7) करोना कालावधीत आरोग्य विभाग मध्ये काम केलेल्या सर्व कामगारांना नोकरीत समाविष्ट करावेत.

वरील प्रमुख मागण्यांचे निवेदन मा निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, विराज टिकेकर, संदिप लोणारी, गणेश टिंगरे, अण्णा महाजन, विवेक ठकार, कस्तुरी बडगु, हे उपस्थित होते.

या अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, तुकाराम डिंबळे,उमेश आणेराव, सुरेश जाधव,उमेश विस्वाद, बाळासाहेब पाटील लता ढगे यांनी मार्गदर्शन केले वेळी विविध ऊद्योगातील संघटीत असंघीटत क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते .