पुणे, दि. २६ एप्रिल २०२३: पुणे परिमंडलातील ६ लाख ६० हजार ५२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात २२०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण २ लाख ८८ हजार २३६ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ हजार ५१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ३८ हजार ४६६ वीजग्राहकांकडे ३५ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख १६ हजार ९२६ ग्राहकांकडे १९ कोटी १२ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ६६५ ग्राहकांकडे ७ कोटी ७८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ८७५ ग्राहकांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४५७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ३३ हजार ८२५ वीजग्राहकांकडे ५१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर २२५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान