December 13, 2024

भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

पुणे, 27 जून 2023: भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत येणाऱ्या दत्तनगर चौक ते संतोषनगर कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२५ मीटर नो पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ११ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.