पुणे, १/६/२०२३: वानवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत जांभुळरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे (दिव्यानगर) जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस सुमारे ४०० मीटर पर्यंत तसेच येरवडा वाहतूक विभागाच्या हद्दीत विमानतळ मार्गावरील नागपूर चाळ गल्ली क्र. १ ते नागपूर चाळ गल्ली क्र. ४ पर्यंत व विमानतळ मार्गावर पोस्ट कार्यालय चौक ते जेलमार्ग पोलीस चौकी पर्यंत येरवडा कारागृह सुरक्षा भिंती लगत नो पार्किंग करण्यात आले आहे.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे १३ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन