September 10, 2024

सिटीएफसी पुणे, राहुल एफए, एनडीए युथ स्पोर्टस क्लब, संगम बॉईज उपांत्यपूर्व फेरीत

पुणे ११ मे २०२३ – सिटी एफसी पुणे, राहुल एफए, एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब, संगम यंग बॉईज संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी राखताना द्वितीय-तृतीय श्रेणीच्या अॅस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यापूर्व फेरीत प्रवेश केला.
पिंपरी येथील डॉ. हेडगेवार मैदानावर झालेल्या सामन्यात रोहित रावतने २४वियी मिनिटला केलेल्या एकमात्र गोलच्या आधारावर सिटी एफसी संघाने अखिल भुसारी कॉलनी क्लब संघाचा १-० असा पराभव केला.
एनडीए संघाने नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर शूट-आऊटमध्ये सनी डेज संघावर ५-४ असा विजय मिळविला. नियोजित वेळेत संदीप सिंगने १९व्या मिनिटाला एनडीए संघाला आघाडीवर नेले. पण, येझाज शेखने २९व्या मिनिटाला सनी डेज संघाला बरोबरी साधून दिली.
शूट-आऊटमध्ये एनडीएकडून रितेश ठाकूर, सुधीर कुमार, दिनेश माने, संदीप सिंग, अजेश सी. ए. यांनी जाळीचा अचूक वेध घेतला. सनी डेजकडून सोहेल शेख, विशाल बेनवंश, शुभम टेम्बु्र्णे, सुंदर वेळू यांनाच गोल करण्यात यश आले.
राहुल एफए संघाने नॉईज बॉईजचे आव्हान २-१ असे परतवून लावले. रुतुराज गवळीने नवव्या मिनिटाला आघाडी मिळवून देणारा गोल केला. उत्तरार्धात ओम पाटणकरने ३८व्या मिनिटाला नॉईजी बॉईजला बरोबरी साधून दिली होती. मात्र, ४७व्या मिनिटाला कपिल वालेचाने गोल करून राहुल एफए संघाला पुन्हा आघाडीवर नेले आणि हीच आघाडी कायम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
अखेरच्या सामन्यात संगम यंग बॉईज संघाने पुणे पायोनिअर्सची घोडदौड ३-० अशी रोखली. विपुल गोफणेने ४थ्या मिनिटाला पहिला गोल केला. दोनच मिनिटांनी इरफान अन्सारीने आघाडी वाढवली आणि २२व्या मिनिटाला अन्सारीनेच गोल करून आघाडी भक्कम केली. याच आघाडीवर संगम बॉईजने विजय मिळविला.
निकाल –
सिटी एफसी पुणे १ (रोहत रावत २४वे मिनिट) वि.वि. अखिल भुसारी कॉलनी एफसी ०
एनडीए युथ बॉईज १ (५) (संदीप सिंग १९वे मिनिट, रितेश ठाकूर, सुधिर कुमार, दिनेश माने, संदीप सिंग, अजेश सी.ए.) वि.वि. सनी डेज १ (४) (येझाज शेख २९वे मिनिट, सोहोल शेख, विशाल बेनवंश, शुभम टेम्बुर्णे, सुंदर वेळू)
राहुल एफ ए २ (रुतुराज गवळी ९वे मिनिट, कपिल वालेचा ४७वे मिनिट) वि.वि. नॉईजी बॉईज १ (ओम पाटणकर ३८वे मिनिट)
संगम यंग बॉईज ३ (विपुल गोफणे ४ थे मिनिट, इरफान अन्सारी ६वे, २२वे मिनिट) वि.वि. पुणे पायोनिअर्स ०