पुणे, 22 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पहिल्या फेरीत डीएफए मुंबई, सीएमएस फाल्कन्स ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
निगडी येथील मदन लाल धिंग्रा स्टेडियमवर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत शाहिद शेख(41, 42मि.) याने नोंदवलेल्या दोन गोलांच्या जोरावर डीएफए मुंबई संघाने मिलर्स फुटबॉल क्लबचा 2-0 असा ओआरभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात दक्ष एम(6मि.) याने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर सीएमएस फाल्कन्स ब संघाने घोरपडी यंग वन्स संघावर 1-0 असा विजय मिळवला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, पीसीएमसीचे राजू मिसाळ, सीएमएसचे अध्यक्ष टी.पी.विजयन, फ्रेंड्स क्लब ऑफ प्राधिकरणचे कीर्ती शहा, पीसीएमसी हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शनूप नायर आणि तनय आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:
डीएफए मुंबई: 2 (शाहिद शेख 41, 42मि.)वि.वि.मिलर्स फुटबॉल क्लब: 0;
डीएफए मुंबई: 2 (शाहिद शेख 41, 42मि.)वि.वि.मिलर्स फुटबॉल क्लब: 0;
सीएमएस फाल्कन्स ब: 1 (दक्ष एम 6मि.)वि.वि.घोरपडी यंग वन्स: 0.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.