पुणे, 27 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीतडीएफए मुंबई व स्ट्रायकर्स एफसी या संघांनी अनुक्रमे सीएमएस फाल्कन्स ब व सीएमएस फाल्कन्स अ संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निगडी येथील मदन लाल धिंग्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात डीएफए मुंबई संघाने सीएमएस फाल्कन्स ब संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. डीएफए मुंबई संघाने सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक खेळ केला. 11व्या मिनिटाला शाहिद शेखने चेंडूवर सुरेख ताबा मिळवत गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सहाच मिनिटांनी असद सय्यदने गोल करुन डीएफए मुंबई संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात डीएफए मुंबई संघाकडे 2-0 अशी आघाडी कायम होती.
उत्तरार्धात मात्र सीएमएस फाल्कन्स ब संघाच्या विनोद आनंद याने सुरेख चाली केल्या, पण डीएफए मुंबई संघाने आपली बचावफळी अभेद्य ठेवत गोल होऊ न देण्याची खबरदारी घेतली. सामन्याच्या शेवटपर्यंत डीएफए मुंबई संघाने आपली आघाडी कायम ठेवतसीएमएस फाल्कन्स ब संघावर विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात सुबोध लामा(42मि.) याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर स्ट्रायकर्स एफसी संघाने सीएमएस फाल्कन्स अ संघाचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
40 वर्षांवरील गटात पुणे वेटरन्स संघाने पुणे मास्टर्स संघाचा 2-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून संजय व्ही(10, 15मि.) याने दोन गोल केले. दुसऱ्या सामन्यात आकतसुखी संघाने होयस संघाचा 4-0 असा सहज पराभव केला. आकतसुखी संघाकडून विवेक रोकडे(6मि.), मतीन शेख(10मि.), विनय वर्गीस(46मि.), जेसन वाझ(48मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
डीएफए मुंबई: 2 (शाहिद शेख 11मि., असद सय्यद 17मि.) वि.वि.सीएमएस फाल्कन्स ब: 0;
स्ट्रायकर्स एफसी: 1 (सुबोध लामा 42मि.) वि.वि.सीएमएस फाल्कन्स अ: 0;.
40 वर्षांवरील गट:
पुणे वेटरन्स 2 (संजय व्ही 10, 15मि.) वि.वि.पुणे मास्टर्स 0;
आकतसुखी: 4 (विवेक रोकडे 6मि., मतीन शेख 10मि., विनय वर्गीस 46मि., जेसन वाझ 48मि.) वि.वि.होयस: 0.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील