May 15, 2024

द पूना क्लब स्विमिंग लीग 2023 स्पर्धेत किंग्ज, फ्लिपर्स, जेट्स, माव्हरिक्स संघांची आगेकूच

पुणे, 27 मे 2023 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित पहिल्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2023 स्पर्धेत किंग्ज, फ्लिपर्स, जेट्स, माव्हरिक्स, पँथर्स, ऑल स्टार्स या संघानी आगेकूच केली.

पूना क्लब स्विमिंग पूल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात दिवीज पिंगे, आहान भिसे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर किंग्ज संघाने 102 गुणांसह आघाडी मिळवत बाद फेरी गाठली. ब गटात अनाइशा सूद, रेयान सांघवी, सुशील सांघवी यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर फ्लिपर्स संघाने 104 गुणांसह अव्वल स्थान पटकावत आगेकूच केली. यामध्ये 10 वर्षाखालील फ्रीस्टाइल (20मी) प्रकारात फ्लिपर्सच्या रेयान सांघवीने 14.19सेकंद वेळ नोंदवत पहिला, तर माव्हरिक्सच्या जैनील परमार(15:62से) व पँथर्सच्या वेदांत कृष्णमूर्ती(16:00 से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकवला.

अ गटात जेट्स संघाने 99 गुणांसह दुसरे स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला. तर, ब गटात माव्हरिक्स संघाने 101 गुणांसह बाद फेरी गाठली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोके, वेंकीजचे मालक जगदीश राव, अमित रोपलेकर, इंद्रनील मुजगुले, अमित परमार, शुभा गडकरी, मनजीत राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव कर्नल सरकार, स्पर्धा संचालक तुषार आसवानी, समीर सांघवी व कुणाल सांघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:(प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमानुसार):
8 वर्षांखालील फ्रीस्टाईल(20 मी): 1.समारा मास्टर(पँथर्स, 19.28से), 2.वायुश रांका(गोयल गंगा, 20:87से), 3.रेयांश झावर(फ्लिपर्स,26:53से);
8 वर्षाखालील फ्रीस्टाईल(20मी):1.लारा वासवानी(ऑल स्टार्स,19:72से), 2.आनंद भंडारी(किंग्ज,22:44से), 3.येवा रोपलेकर(डॉल्फिन्स, 23:75से);
10 वर्षाखालील फ्रीस्टाइल (20मी): 1.रेयान सांघवी(फ्लिपर्स, 14.19से), 2.जैनील परमार(माव्हरिक्स, 15:62से), 3.वेदांत कृष्णमूर्ती(पँथर्स, 16:00 से);
14 वर्षाखालील फ्रीस्टाइल (40मी):1. विहान तुळपुळे (जेट्स, 27.12 से), 2. मिहिका मोईटे (डॉल्फिन्स, 32:50 से), 3. ध्यान झुनझुनवाला (ऑल स्टार्स, 33:25 से);
14 वर्षाखालील ब्रेस्टस्ट्रोक (40 मी): 1.अनाइशा सूद (फ्लिपर्स, 37.03 से); 2.नेमेशा गढोके(पँथर्स,33.00से),3. जिया वासवानी (गोयल गंगा, 35:47 से);
18 वर्षाखालील फ्रीस्टाइल (40मी): 1.रणवीर भोसले (माव्हरिक्स, 25.16 से); 2.आर्यन सांघवी(फ्लिपर्स,29:02से), 3.झहरा मास्टर(पँथर्स,29:62से);
18 वर्षाखालील ब्रेस्टस्ट्रोक (40मी): 1.आरव दिवेट (पँथर्स, 34.91 से); 2.कार्तिकेय नांगराणी(माव्हरिक्स ,36:04से), 3.वेद कंस्तिया(फ्लिपर्स,38:75से);
40 वर्षाखालील /ओपन फ्रीस्टाइल(40मी):1.दिवीज पिंगे(किंग्ज, 23.19से); 2.योहान थडानी(जेट्स,28:31से), 3.निखिल परमार(ऑल स्टार्स, 28:47से);
40 वर्षाखालील /ओपन ब्रेस्टस्ट्रोक(40मी): 1.आहान भिसे (किंग्ज, 30.75से), 2.रौनकमाळी(जेट्स, 34:51से), 3.केतन रुइकर (ऑल स्टार्स, 34:58से);
50 वर्षाखालील फ्रीस्टाइल(40मी):1.राजीव संगतानी(माव्हरिक्स, 26.75 से); 2.कुणाल सांघवी(फ्लिपर्स, 27:22से), 3.प्रमीत सूद(गोयल गंगा,28:66से);
50वर्षांखालील ब्रेस्टस्ट्रोक(40मी): 1.समीर मास्टर(पँथर्स, 36.60से), 2.अजय सांघवी(फ्लिपर्स, 37.41से), 3.लायला संगतानी(माव्हरिक्स, 40.28से);
50वर्षाखालील ब्रेस्टस्ट्रोक(40मी): 1. करिश्मा शहा(ऑल स्टार्स, 36:88से), 2.हुझेफा ताहेरभॉय(जेट्स, 43:38से), 3. सनत परमार(किंग्ज, 45:06से);
50वर्षाखालील फ्रीस्टाइल (40मी): 1.आदित्य सिंग (गोयल गंगा, 26.44से); 2.सुशील सांघवी(फ्लिपर्स, 29:35से), 3.राजेंद्र जाधव(माव्हरिक्स, 34:97से);
50 वर्षावरील ब्रेस्टस्ट्रोक (40मी): 1.सुशील सांघवी (फ्लिपर्स, 29.03), 2.राजेंद्र जाधव (माव्हरिक्स, 42.06से.), 3.आदित्य सिंग (गोयल गंगा, 42.16 से);
ओपन बॅकस्ट्रोक(40मी): 1.रोहन माली(माव्हरिक्स, 26.69से), 2.सुरदा सांघवी(फ्लिपर्स,32:56से), 3.खुशी शाह(गोयल गंगा,33:91से).