July 24, 2024

तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कोर्ट मॅजिशियन,एमडब्लूटीए 1, एफसी ब, सोलारिस ईगल्स संघांची विजयी सलामी

पुणे, 12 फेब्रुवारी 2024: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत कोर्ट मॅजिशियन,एमडब्लूटीए 1, एफसी ब, सोलारिस ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कोर्ट मॅजिशियन संघाने टीम योनीराइजचा 24-11असा पराभव केला. कोर्ट मॅजिशियनकडून गिरीश कुकरेजा, सुधाकर रामचंद्रन, परीक्षित तांबे, मनीष टिपणीस, अजिंक्य पाटणकर, शिलादित्य बॅनर्जी, निखिल भगत यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात सुमंत पॉल, गजानन कुलकर्णी,राजेश मंकणी, आशिष मणियार, प्रफुल आशर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए 1 संघाने एफसी क संघाचा 21-09 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

अन्य लढतीत एफसी ब संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 20-14 असा पराभव करून विजयी सलामी दिली. सोलारिस ईगल्स संघाने पीवायसी ई संघावर 24-07 असा विजय मिळवला. सोलारिस ईगल्सकडून संजू घोलप, रवी कात्रे,सिद्धू भरमगोंडे, हेमंत भोसले, निनाद वाणीकर, अन्वित पाठक, रवींद्र पांडे, सिद्धार्थ जोशी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

निकाल: साखळी फेरी:
कोर्ट मॅजिशियन वि.वि.टीम योनीराइज 24-11(100अधिक गट: गिरीश कुकरेजा/सुधाकर रामचंद्रन वि.वि.गौरांग भट्ट/ऋषिकेश घारे 6-5(5); 90अधिक गट: परीक्षित तांबे/मनीष टिपणीस वि.वि.अनिर्बन गोस्वामी/प्रतिक देसाई 6-1; खुला गट:अजिंक्य पाटणकर/शिलादित्य बॅनर्जी वि.वि.यश देशमुख/मंदार सोवनी 6-5(4); खुला गट: गिरीश कुकरेजा/निखिल भगत वि.वि.दिनेश माहेश्वरी/सिद्धार्थ पंतवैद्य 6-0);

एमडब्लूटीए 1 वि.वि.एफसी क 21-09(100 अधिक गट: सुमंत पॉल/गजानन कुलकर्णी वि.वि.राजेश जोशी/संजय पाटील 6-1; 90 अधिक गट:संजय आशर/जयदीप वाकणकर पराभुत वि.अभिजित सावकार/सुनीत सातोस्कर 3-6; खुला गट: राजेश मंकणी/आशिष मणियार वि.वि.लक्ष्मण विडेकर/विनीत शहा 6-2; खुला गट: प्रफुल आशर/सुमंत पॉल वि.वि.पंकज सांधिकर/रिशद सोमजी 6-0);

एफसी ब वि.वि.महाराष्ट्र मंडळ 20-14(100 अधिक गट:पांडुरंग पाडळे/श्रीवर्धन सुखात्मजा वि.वि.सुमित झाल्टे/अभिषेक चव्हाण 6-4; 90 अधिक गट: नकुल फिरोदिया/महेंद्र देवकर पराभुत वि.अर्पित श्रॉफ/विकास बचलू 2-6; खुला गट: सचिन साळुंखे/गणेश देवखिले वि.वि.अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमल 6-2; खुला गट: गौरव राव/संग्राम कोतवाल वि.वि.राजेंद्र देशमुख/हेमंत देवरे 6-2);

सोलारिस ईगल्स वि.वि.पीवायसी ई 24-07(100 अधिक गट:संजू घोलप/रवी कात्रे वि.वि.बिपीन देव/शंकर भगत 6-3; 90अधिक गट: सिद्धू भरमगोंडे/हेमंत भोसले वि.वि.सौरभ चिंचणकर/पराग टेपन 6-2; खुला गट: निनाद वाणीकर/अन्वित पाठक वि.वि.अनुज मेहता/चिन्मय चिरपुटकर 6-0; खुला गट: रवींद्र पांडे/सिद्धार्थ जोशी वि.वि.आकाश सुपेकर/शिरीष साठे 6-2).