February 28, 2024

18व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत यशवंतराजे पवार, निब्रास हुसेन यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

मुंबई, 12 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 18व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत यशवंतराजे पवार, आसामच्या निब्रास हुसेन यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व बॉबे जिमखाना येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या यशवंतराजे पवार याने तेलंगणाच्या तेराव्या मानांकित तनिश वुंड्यालाचा 6-3, 1-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव अनपेक्षित निकाल नोंदवला. आसामच्या निब्रास हुसेन याने कर्नाटकच्या दहाव्या मानांकित निहाल एस रेड्डीचा 6-2, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित आरव छल्लानी व नवव्या मानांकित वीर चतुर यांनी अनुक्रमे हरियाणाच्या आरव मलिक व राजस्थानच्या जयवीर हुडा यांचा 6-0, 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. महाराष्ट्राच्या अद्वैत गुंड याने उत्तरप्रदेशच्या युवराज सिंगचा 6-2, 6-0 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
युवान गर्ग (उत्तरप्रदेश)[1]वि.वि.आदिश पीएम (तामिळनाडू)6-0, 6-0;
स्वयम रथ(कर्नाटक)वि.वि.रियान नंदनकर (गुजरात)6-1, 6-0;
ईशानदीप बोरो (आसाम)वि.वि.तनुष एस बीसी(कर्नाटक)6-2, 7-5;
यशवंतराजे पवार(महाराष्ट्र)वि.वि.तनिश वुंड्याला(तेलंगणा)[13]6-3, 1-6, 6-4;
निब्रास हुसेन(आसाम)वि.वि.निहाल एस रेड्डी (कर्नाटक)[10]6-2, 6-4
अथर्व नरसिंघानी (पश्चिम बंगाल)वि.वि.हर्ष बन्सल(राजस्थान)6-2, 6-1;
अर्जुन दुआ(दिल्ली)[11]वि.वि.तक्षिल नगर (महाराष्ट्र)6-2, 6-4;
देवांश कंबोज (हरियाणा)[१५]वि.वि.आरव बेले(महाराष्ट्र)7-5, 6-3;
आरव छल्लानी (महाराष्ट्र)[4]वि.वि.आरव मलिक (हरियाणा)6-0, 6-0;
अद्वैत गुंड (महाराष्ट्र)वि.वि.युवराज सिंग(उत्तरप्रदेश)6-2, 6-0;
वीर चतुर (महाराष्ट्र)[9]वि.वि.जयवीर हुडा (राजस्थान)6-0, 6-0;
रुकेश दल्वादी (गुजरात) वि.वि.कबिलाययाती चीलांधिरी (तामिळनाडू)7-5, 6-0;
कबीर दहिया(आसाम) वि.वि.प्रशांत बोराह (हरयाणा) 6-1, 4-6, 6-0;
मुली:
अवनी पुनागंटी (कर्नाटक)वि.वि.हर्षा देशपांडे(महाराष्ट्र)5-7, 6-1, 7-5;
दिया आर जानकी (तामिळनाडू)वि.वि.हंशिता खट्टर(उत्तर प्रदेश)6-1, 6-1;
भृथी वेल्लादंडी (कर्नाटक)वि.वि.मोक्ष डोक्कू (तेलंगणा)6-1, 6-4;
असीस ब्रार(पंजाब)वि.वि.प्रियांगसी चॅटर्जी(पश्चिम बांगला)6-3, 3-6, 6-4;
शुभी शर्मा(दिल्ली)वि.वि.वृत्तिका शहा(महाराष्ट्र)6-0,7-5;
धृती गुंडू(तेलंगणा)वि.वि.पूज्य राम ओरुगंती (आंध्रप्रदेश)4-6, 6-4, 6-3;
मायरा शेख(महाराष्ट्र)वि.वि.अन्या बिस्वास(पश्चिम बंगला)6-3, 6-2;
कनिष्क गोविंद (तामिळनाडू)वि.वि.वजूहा खान(गुजरात)6-0, 6-1.