पुणे, 9 एप्रिल, 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ, विद्यांचल या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत गट साखळी फेरीत मुलींच्या गटात ब गटात एबीसी संघाने विद्या व्हॅली संघाचा 32-18 असा पराभव केला. एबीसी संघाकडून रावी लोंढे(10गुण), युविका त्यागी(8गुण) यांनी सुरेख कामगिरी केली. अन्य लढतीत फाल्कन्स संघाने एबीसी संघाचा 59-58 असा कडवा प्रतिकार केला. विजयी संघाकडून क्रिया कौशिक(24गुण), पूर्वा जगदाळे(13गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अ गटात डेक्कन जिमखाना अ संघाने साई स्पोर्टस संघाचा 85-09 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. डेक्कन जिमखाना संघाकडून अनुशा सोनटक्के(16गुण), मिहिका गद्रे(10गुण) यांनी विजयी खेळी केली.
मुलांच्या गटात अ गटात चुरशीच्या लढतीत विद्यांचल संघाने सेंट मेरीज संघाचा 61-59 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून शौर्य दळवी(20गुण), युवराज सुतार(16गुण) यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात अभिनव करमरकर(21गुण), आर्यन प्रजापती(17गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना अ संघाने एसजी अकादमी संघाचा 64-17 असा एकतर्फी पराभव केला. ड गटात राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी संघाने सीबीसी संघाचा 47-35 असा पराभव केला.
निकाल: गट साखळी फेरी:
मुली:
गट ब: फाल्कन्स: 59(क्रिया कौशिक 24गुण, पूर्वा जगदाळे 13गुण) वि.वि.एबीसी: 58(रावी लोंढे 25गुण); मध्यंतर: 25-28;
गट ब: एबीसी: 32(रावी लोंढे 10गुण, युविका त्यागी 8गुण) वि.वि.विद्या व्हॅली: 18(सुहानी भार्गवा 6गुण); मध्यंतर: 27-09;
गट अ: डेक्कन जिमखाना अ: 85(अनुशा सोनटक्के 16गुण, मिहिका गद्रे 10गुण) वि.वि.साई स्पोर्टस: 09(माही शिंदे 5गुण); मध्यंतर:49 -05;
मुले:
गट अ: विद्यांचल: 61(शौर्य दळवी 20गुण, युवराज सुतार 16गुण) वि.वि.सेंट मेरीज: 59(रोहन शर्मा 25जून); मध्यंतर: 20-22;
गट अ: डेक्कन जिमखाना अ: 64(अभिनव करमरकर 21गुण, आर्यन प्रजापती 17गुण) वि.वि.एसजी अकादमी: 17(हर्षद पवार 8गुण); मध्यंतर: 38-08;
गट ड: राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी: 47(अंकित मुसीब 22गुण) वि.वि.सीबीसी: 35(प्रेम बस्तवडे 14गुण); मध्यंतर: 16-26;

More Stories
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत विद्यांचल, डेक्कन जिमखाना अ, महाराष्ट्र मंडळ, सेंट मेरीज संघांचे विजय
तिसऱ्या पुसाळकर फाउंडेशन पुरस्कृत पुणे पिकलबॉल साखळी स्पर्धेत फाल्कन फुरी, स्मॅशिंग शार्क, टस्कर टायटन्स, गोल्डन ईगल्स संघांची विजयी सलामी
चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत आठ संघ सहभागी