October 17, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संत तुकाराम महाराजांच्या वंशजाची शेवटची इच्छा केली पूर्ण….

पुणे, 10 फेब्रुवारी 2025: काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं अस लिहिलं होत.आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शिरीष महाराज मोरे यांच्यावर असलेल्या ३२ लाखाच्या कर्जाची रक्कम माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मार्फत मोरे कुटुंबियांना सुपूर्द केली आहे.

पाच फेब्रुवारी रोजी शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेमुळे देहूत मोठी खळबळ उडाली होती. शिरीष महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यापैकी एका चिठ्ठीत त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. याचीच दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मार्फत कर्जाची रक्कम मोरे कुटुंबाला सुपूर्द केली.

याबाबत माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की देश देव आणि धर्मासाठी आधुनिक काळामध्ये लढणारी खूप कमी मंडळी असून शिरीष महाराज मोरे तर ३० वर्षाचं तरुण होता. हिंदुत्वासाठी लढणारे शिरीष कुमार मोरे यांनी आत्महत्या पूर्वी जी चिठ्ठी लिहिली होती ती वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं आणि चार-पाच दिवसा अगोदर जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी याबाबत चर्चा केली असता ते देखील खूप दुःखी झाले होते. मोरे यांनी थोडी जरी कल्पना दिली असती तर ही वेळच आली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आज वाढदिवस असून आमचं कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून आणि मोरे यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कर्जाची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली आहे.अस यावेळी शिवतारे म्हणाले.

You may have missed