पुणे, 19 एप्रिल 2024: डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत देशभरातून एकूण 150 अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे दि.20 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक संग्राम चाफेकर यांनी सांगितले की, तसेच, ही स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत नीव कोठारी, सक्षम भन्साळी, सिध्देश खाडे, स्वानिका रॉय, देवांशी प्रभुदेसाई, काव्या देशमुख हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.
स्पर्धेसाठी निहारिका गोरे यांची एमएसएलटीए सुपर वायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने शनिवार, 20 व रविवार, 21 एप्रिल रोजी, तर मुख्य ड्रॉ 22 एप्रिल पासून सुरू होणार असल्याची माहिती संग्राम चाफेकर यांनी दिली.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय