पुणे, 19 एप्रिल 2024: डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत देशभरातून एकूण 150 अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे दि.20 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक संग्राम चाफेकर यांनी सांगितले की, तसेच, ही स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत नीव कोठारी, सक्षम भन्साळी, सिध्देश खाडे, स्वानिका रॉय, देवांशी प्रभुदेसाई, काव्या देशमुख हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.
स्पर्धेसाठी निहारिका गोरे यांची एमएसएलटीए सुपर वायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने शनिवार, 20 व रविवार, 21 एप्रिल रोजी, तर मुख्य ड्रॉ 22 एप्रिल पासून सुरू होणार असल्याची माहिती संग्राम चाफेकर यांनी दिली.

More Stories
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देव रुपारेलिया, लक्ष्या राजेश यांना अग्रमानांकन