July 25, 2024

दिएगो अ संघाची जेतेपदासाठी गनर्स एफए विरुद्ध लढत

पुणे, दिनांक 20 मे 2023 : पहिल्यावहिल्या अस्पायर करंडक 2023 फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल – प्रथम श्रेणी विभागात दिएगो ज्युनियर्स अ संघाची गनर्स एफए विरुद्ध निर्णायक लढत होईल. पिंपरी येथील डॉ. हेगडेवार मैदानावर रविवारी लढत होईल. त्याचप्रमाणे दुर्गा एसए संघ द्वितीय तृतीय श्रेणी विभागात सिटी एफसी पुणे संघाच्या आव्हानाला उद्या सामोरा जाईल.
वरिष्ठ विभागात दिएगो ज्युनियर्स अ संघाने इंद्रायणी एफसी संघाचे कडवे आव्हान 1-0 असे परतावून लावले. शुभम महापदी याने 24 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. त्याने ऑफ-साईडचा सापळा भेदत लक्ष्य साधले.
गनर्स एफए संघाने थंडरकॅट्झ संघाला  2-1 असे हरवून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. अखेरच्या 60व्या मिनिटाला जयंत निंबाळकर याने हेडरवर केलेला गोल निर्णायक ठरला. त्यापूर्वी थंडरकॅट्झने आरिव जोधवानी याच्या गोलमुळे 17 व्या मिनिटाला आघाडी घेतली होती, मात्र गौतम कदम याच्याकडून 28 व्या मिनिटाला स्वयंगोल झाला, त्यामुळे गनर्स संघ बरोबरी साधू शकला.
दिवसाच्या प्रारंभी कनिष्ठ विभागाच्या लढती झाल्या.
निकाल (उपांत्य फेरी) : अव्वल प्रथम श्रेणी :
दिएगो ज्युनियर्स अ : (शुभम महापदी 24 वा मिनिट) विजयी विरुद्ध इंद्रायणी एससी : 0
गनर्स एफए : 2 ( गौतम कदम 28 स्वयंगोल; जयंत निंबाळकर 60) वि वि थंडरकॅट्झ : 1 (आरीव जोधवानी 17)
द्वितीय तृतीय श्रेणी विभाग : दुर्गा एसए : 1 ( नेल्सन पाष्टे 56) वि वि संगम यंग बॉईज ब : 0
सिटी एफसी पुणे : 2 (सात्विक नाईक 6, प्रीतीश बाबर 32) वि वि एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब : 1 (रितेश ठाकूर 22)