May 20, 2024

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाची विजयी सलामी

पुणे, 16 जुन 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटने(एमसीए)च्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील खेळाडू अर्शिन कुलकर्णी (60 धावा) याने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघाचा 4धावांनी(डकवर्थ लुईस नियमानुसार(डीएलएस))पराभव करत विजयी सलामी दिली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6बाद 195धावा केल्या. अर्शिन कुलकर्णीने 34चेंडूत 3चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 60 धावांची धडाकेबाज खेळी केली. अर्शिनला हर्षद खडीवालेने 34चेंडूत 3चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 43 धावा काढून साथ दिली. सलामीची जोडी अर्शिन व हर्षद यांनी ६४ चेंडूत ९९ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्याचवेळी डावखुरा वेगवान गोलंदाज हितेश वाळुंजने आपल्या गोलंदाजीवर अर्शिनला झेल बाद करून तंबूत परत पाठवले. त्यानंतर कर्णधार राहुल त्रिपाठी(11धावा), भारताचा 19 वर्षाखालील खेळाडू सिद्धेश वीर(7धावा), मंदार भंडारी (8) हे झटपट बाद झाल्यामुळे 16षटकात 5बाद 135 धावा असा अडचणीत असताना पाऊस सुरु झाला. त्यानंतर धनराज शिंदे(35 धावा) व कौशल तांबे(21धावा) यांनी धावा काढून नाशिक संघाला 195 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

याच्या उत्तरात फलंदाजीस उतरलेल्या छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघ ८ चेंडूत बिनबाद १५ धावावर असताना पाऊस पुन्हा सुरु झाला. पावसामुळे खेळ थांबविण्यात आला आणि खेळ पून्हा सुरु झाल्यावर चाट्र्रपती संभाजीनगर संघासमोर डक वर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 157 धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. यामध्ये सौरभ नवले 46(24,7×4), मुर्तझा ट्रंकवाला 35(21,6×4) या जोडीने 63 धावांची भागीदारी करून सुरेख सुरुवात करून दिली. पण अक्षय वाईकरने मुर्तझाला, तर प्रशांत सोळंकीने सौरभला बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर रणजीत निकम(24धावा) याने दिलेली लढत अपुरी ठरली व नाशिक संघाने आपला पहिला विजय नोंदवला.

ईगल नाशिक टायटन्स संघाचा पुढील सामना १८ जून रोजी सोलापूर रॉयल्स संघाविरुद्ध दुपारी २ वाजता होणार असून छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघाचा पुणेरी बाप्पा संघाशी रात्री आठ वाजता होणार याच दिवशी होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

ईगल नाशिक टायटन्स: 20 षटकात 6बाद 195धावा(अर्शिन कुलकर्णी 60(34,3×4,5×6), हर्षद खडीवाले 43(34,3×4,2×6), धनराज शिंदे नाबाद 35(17,1×4,3×6), रामेश्वर दौड 2-31, शामसुजमा काझी 2-31, हितेश वाळुंज 1-24) वि.वि.छत्रपती संभाजी किंग्ज: 15षटकात 6बाद 152धावा(सौरभ नवले 46(24,7×4), मुर्तझा ट्रंकवाला 35(21,6×4), रणजीत निकम नाबाद 24(18), राजवर्धन हंगर्गेकर 21, अक्षय वाईकर 2-22, प्रशांत सोळंकी 1-20); सामनावीर- अर्शिन कुलकर्णी; ईगल नाशिक टायटन्स संघ 4 धावांनी विजयी.