पुणे, 09 मे 2024 : मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून अर्ज क्र.१७ भरावा. असे नागरिक मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार असल्याने ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रीया करावी, असा संदेश भ्रमणध्वनीवरून देण्यात येत आहे.अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही