July 27, 2024

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना व पूना क्लब यांच्यात अंतिम लढत

पुणे, दि. 13 सप्टेंबर 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत सूरज शिंदे(75धावा), तुषार श्रीवास्तव(60धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पीबीकेजेसीए संघाचा 12धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात अकिब शेख(नाबाद 58), सागर बिरदवडे(नाबाद 51) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूना क्लब संघाने युनायटेड स्पोर्टस क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव केला.

पीवायसी हिंदू जिमखाना, डिझायर स्पोर्टस क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात पीबीकेजेसीए संघाने आज दिवस अखेर 22 षटकात 3 गडी बाद 160 धावा पासून खेळ पुढे सूरू झाला. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाने 40 षटकांत 7बाद312 धावा केल्या. पण त्यांचे पाच गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 277झाली. याच्या उत्तरात पीबीकेजेसीए संघाने 40 षटकांत 4 गडी बाद 313 धावा केल्या. 4गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 293(वजा 20 धावा) झाली. यात निकुंज विठलानीने 163चेंडूत 17चौकारासह नाबाद 135 धावा चोपल्या. तर, अभिषेक पवारने 109चेंडूत 15चौकार व 2षटकारासह 133 धावा काढून त्याला साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 229चेंडूत 259धावांची भागीदारी करून संघाला पहिल्या डावात 16 धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात डेक्कन जिमखाना संघाने 20 षटकात 6 बाद 214 धावा केल्या. 6गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 184धावा(वजा30 धावा) झाली.यात सूरज शिंदेने 51चेंडूत 5चौकार व 4षटकाराच्या मदतीने 75धावा, तर तुषार श्रीवास्तवने 54चेंडूत 5चौकार व 1षटकारासह 60 धावा, हर्ष संघवीने 35 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. विजयासाठी पीबीकेजेसीए संघासमोर 169धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पीबीकेजेसीए संघाला 20 षटकात 9 गडी बाद 201धावाच करता आल्या. 9गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 156 (वजा 45 धावा) झाली. यात मेहुल पटेलने एकाबाजूने लढताना 49चेंडूत 10चौकार व 1षटकारासह 75 धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाकडून पियुष साळवी(3-52), आदिनाथ गायकवाड(2-42), अजय बोरुडे(2-27) यांनी सुरेख गोलंदाजी करून संघाला 12 धावांनी विजय मिळवला.

डिझायर स्पोर्टस क्लब मैदानावरील लढतीत युनायटेड स्पोर्टस कलब संघाचा दुसरा डाव आज 4षटकात बिनबाद 18धावापासून खेळ पुढे सूरू झाला. तत्पूर्वी काल युनायटेड स्पोर्टस क्लबचा पहिला डाव 23.7षटकात सर्वबाद 118धावांवर संपुष्टात आला. त्यांचे 10गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 68धावा झाली. याच्या उत्तरात डावखुरा फिरकीपटू निमिर जोशी(5-22)ने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पूना क्लब संघ 23.7षटकात सर्वबाद 109धावांवर कोसळला. 10गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 59धावा झाली व पहिल्या डावात युनायटेड संघाने 9धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 6बाद 158 धावा केल्या. 6गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 128धावा(वजा 30धावा) झाली. यात कुणाल कोठावडे नाबाद 62, आदित्य राजहंस 27, रोहित करंजकर 25 यांनी धावा केल्या. पुना क्लबकडून अखिलेश गवळे(2-29), हर्षल मिश्रा(1-14), ओंकार आखाडे(1-26) यांनी सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या डावातील 9धावा मिळून विजयासाठी 137 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पूना क्लब संघाने 20 षटकात 3बाद 160 धावा काढून पुर्ण केले. 3 गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 145धावा(वजा 15 धावा) झाली. यामध्ये अकिब शेखने नाबाद 58, सागर बिरदवडे नाबाद 51, अर्जुन वाघ 27 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अकिब शेख व सागर बिरदवडे या जोडीने चौथ्या विकेटसाठी 106चेंडूत 119 धावांची भागीदारी केली.

स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना पूना क्लब वि.डेक्कन जिमखाना यांच्यात 15 व 16 सप्टेंबर रोजी पीवायसी हिंदु जिमखाना मैदानावर होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव : डेक्कन जिमखाना: 40 षटकांत 7बाद 277 (312-35धावा) वि पीबीकेजेसीए: 40 षटकांत 4 गडी बाद 293 (313-20 धावा)(निकुंज विठलानी नाबाद 135(163,17×4), अभिषेक पवार 133(109, 15×4,2×6), धीरज फटांगरे 1-42, आशय पालकर 1-42 -53); पीबीकेजेसीए संघाकडे पहिल्या डावात 16 धावांची आघाडी;

दुसरा डाव: डेक्कन जिमखाना: 20 षटकात 6 गडी बाद 184धावा(214-30 धावा)(सूरज शिंदे 75(51,5×4,4×6), तुषार श्रीवास्तव 60(54,5×4,1×6), हर्ष संघवी 35, शशी गावंडे 2-39, अक्षय दरेकर 1-32) वि.वि.पीबीकेजेसीए: 20 षटकात 9 गडी बाद 156 (201-45 धावा)(मेहुल पटेल 75(49,10×4,1×6), ओंकार खाटपे 23, पियुष साळवी 3-52, आदिनाथ गायकवाड 2-42, अजय बोरुडे 2-27); डेक्कन जिमखाना 12 धावांनी विजयी;

डिझायर स्पोर्टस क्लब मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्टस क्लब: 23.7षटकात सर्वबाद 68धावा (118-50धावा) वि.पूना क्लब: 28.3षटकात सर्वबाद 59धावा(109-50धावा); युनायटेड स्पोर्टस क्लब संघाकडे पहिल्या डावात 9 धावांची आघाडी;

दुसरा डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 20 षटकात 6बाद 128धावा(158-30धावा)(कुणाल कोठावडे नाबाद 62(53,5×4), आदित्य राजहंस 27, रोहित करंजकर 25, अखिलेश गवळे 2-29, हर्षल मिश्रा 1-14, ओंकार आखाडे 1-26) पराभुत वि. पूना क्लब: 20 षटकात 3बाद 145धावा(160-15धावा)(अकिब शेख नाबाद 58(50,4×4,1×6), सागर बिरदवडे नाबाद 51(, अर्जुन वाघ 27, अद्वय शिडये 2-33, निमीर जोशी 1-40); पूना क्लब 7 गडी राखून विजयी.