December 2, 2023

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत द व्हर्लविंड्स, आरएस कॅनन्स, रॉकेट्स संघांची आगेकूच

 पुणे, 14 सप्टेंबर, 2023: पुना क्लब लिमिटेड आयोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत गटसाखळी फेरीत द व्हर्लविंड्स, आरएस कॅनन्स, रॉकेट्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.
 
पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात गट: निशांत मेहता, माधव क्षीरसागर, शौर्य जैन, आनंद केरिंग, सिद्धार्थ मोदी, प्रणय माळगावकर, रिकी राजपाल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर आरएस कॅनन्स संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 4-1 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. ब गटात चुरशीच्या लढतीत द व्हर्लविंड्स संघाने रॅक रायडर्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून विघ्नेश संघवी, सुनील आशेर, रुसी मारोलिया यांनी सुरेख कामगिरी बजावली.
 
ब गटात अन्य लढतीत रॉकेट्स संघाने संघवी शूटर्स संघावर 4-1 असा विजय मिळवला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
अ गट: आरएस कॅनन्स वि.वि.परमार ऑल स्टार्स 4-1 (15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: निशांत मेहता वि.वि.नवीन कोचर 87-81; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: माधव क्षीरसागर/शौर्य जैन वि.वि.उदित संघवी /दशमेश कालरा 97-74; हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200 पॉईंट्स: आनंद केरिंग वि.वि.कपिल सरीन 200-164; 6रेड हॅंडिकॅप स्नूकर: रिकी राजपाल पराभुत वि.सिद्धार्थ मोदी 66-24, 11-56, 35-49; ब्लू शॉट: सिद्धार्थ मोदी/माधव क्षीरसागर/प्रणय माळगावकर/रिकी राजपाल/आनंद केरिंग वि.वि.जगदीशचंद्र आरोळे/उदित संघवी/नवीन कोचर/दशमेश कालरा/सिद्धार्थ मोदी 5-3);
 
ब गट: रॉकेट्स वि.वि.संघवी शूटर्स 4-1(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: सूरज राठी वि.वि.संजय संघवी 73-55; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: वैभव शहा/रोहित चोप्रा पराभुत वि.धीरज कोचर/अश्रफ परवानी 75-90;हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्स: कपिल पंजाबी वि.वि.शाहबेहराम रब्बानी 200-159; 6रेड हॅंडिकॅप स्नूकर: राहुल बग्गा वि.वि.गिरीश दामले 44-35, 56-16; ब्लू शॉट: क्रिश आनंद/वैभव शहा/राहुल बग्गा/कपिल पंजाबी/सूरज राठी वि.वि.शाहबेहराम रब्बानी/अश्रफ परवानी/धीरज कोचर/गिरीश दामले/संजय संघवी 5-4);
 
ब गट: द व्हर्लविंड्स वि.वि.रॅक रायडर्स 3-2(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: विघ्नेश संघवी वि.वि.मिनु पूनावाला 61-36; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: साहिल हांडा/कपिल सामंत पराभुत वि.आशिष पटेल/अनिकेत संघवी 75-102; हँडिकॅप बिलियर्डस 200 पॉईंट्स: सुनील आशेर वि.वि.रमेश केरिंग 200-144; 6रेड हँडीकॅप स्नूकर: रुसी मारोलिया वि.वि.अयान खान 72-57; ब्लू शॉट: रुसी मारोलिया/सुनील आशेर/कपिल सामंत/साहिल हांडा/विग्नेश संघवी पराभुत वि.मुनीज पूनावाला/आशिष पटेल/अनिकेत संघवी/अयान खान/रमेश केरिंग 3-5);