May 18, 2024

पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत राहुल क्रिकेट अकादमी व व्हेरॉक यांच्यात अंतिम लढत

पुणे, 21 नोव्हेंबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत राहुल क्रिकेट अकादमी व व्हेरॉक क्रिकेट अकादमी या संघांनी अनुक्रमे पीवायसी हिंदु जिमखाना व पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत अभिषेक टोपनो(150 धावा व 1-16) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमीचा 321 धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 3बाद 381धावा केल्या. यात अभिषेक टोपनोने 97चेंडूत 18चौकार व 6 षटकारासह 150 धावा चोपल्या. त्याला ओम पाटीलने 104चेंडूत 18चौकारासह 125 धावा काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने १९६ चेंडूत ३०० धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी संघ 14.5 षटकात सर्वबाद 60धावावर संपुष्टात आला. यात जेनील पाध्ये 15, श्रावण पाणिकर 13 यांनी थोडासा प्रतिकार केला. व्हेरॉक संघाकडून अर्णव मधुगिरी(6-16), प्रज्योत गुंडाळे(2-13), अभिषेक टोपनो(1-16) यांनी अफलातून गोलंदाजी करत 321 धावांनी विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात दिप पाटील(1-40 व नाबाद 64) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर राहुल क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखानाचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना : 45 षटकात 9बाद 206धावा(अर्जुन चेपे 41(49,5×4), ओंकार साळुंखे 36(40,5×4), ईशान गुप्ते 39, कुणाल पवार 26, साई कुंभार 3-23, श्रेयश फडतरे 2-12, दिप पाटील 1-40) पराभुत वि.राहुल क्रिकेट अकादमी: 44.5 षटकात 8बाद 207धावा(प्रतिक कडलक 70(72,11×4), दिप पाटील नाबाद 64(68,9×4), प्रसाद आंबळे 28, सार्थक धामधेरे 14, अर्जुन सोनार 3-32 , आरव फाळके 2-43, दर्शील वाघेला 1-33); सामनावीर- दिप पाटील; राहुल क्रिकेट अकादमी 2 गडी राखून विजयी;

व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 45 षटकात 3बाद 381धावा(अभिषेक टोपनो 150(97,18×4,6×6), ओम पाटील 125(104,18×4), प्रज्वल मोरे नाबाद 44(29,5×4), आदर्श गव्हाणे 25, स्वराज पवार 1-47 ) वि.वि. पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी: 14.5 षटकात सर्वबाद 60धावा(जेनील पाध्ये 15, श्रावण पाणिकर 13, अर्णव मधुगिरी 6-16, प्रज्योत गुंडाळे 2-13, अभिषेक टोपनो 1-16); सामनावीर-अभिषेक टोपनो; व्हॅरोक क्रिकेट अकादमी संघ 321 धावांनी विजयी.