July 27, 2024

दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत जीएसटी जायंटस, रेल्वे वॉरियर्स संघांची आगेकूच

पुणे, 10 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटना व एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या तर्फे आयोजित दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत जीएसटी जायंटस, रेल्वे वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत रोहन मारवाह(46धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर जीएसटी जायंटस संघाने पीएमसी टायटन्स संघाचा 6 गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पीएमसी टायटन्स संघाने 10षटकात 3बाद 88धावा केल्या. यात विनित पटेलियाने 19चेंडूत 4चौकार व 4षटकारासह 47धावा, भावेश पाटोळेने 15 धावा केल्या. हे आव्हान जीएसटी टायटन्स संघाने 9.4 षटकात 4बाद 92धावा करून पुर्ण केले. यात रोहन मारवाहने 24चेंडूत 4चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 46 धावा, राहुल गावंडेने 23 धावा काढून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अखेरच्या षटकात विजयासाठी 12धावांची आवश्यकता होती. रोहन मारवाह पहिल्या चेंडूवर झेल बाद झाला. त्यानंतर 5चेंडूत 11 धावा असे समीकरण असताना चंद्रकांत बनकरने 2चेंडूत 2 षटकारासह नाबाद 12 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात नाहिद शेख 27 धावांच्या जोरावर रेल्वे वॉरियर्स संघाने इन्कम टॅक्स टायगर्स संघावर 9 गडी राखून विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन आमदार सिध्दार्थ शिरोळे, महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अध्यक्ष रणजीत मोरे, सचिव सुधीर कुलकर्णी, महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचा कर्णधार व माजी रणजीपटू रणजित खिरीड, एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: बाद फेरी:
पीएमसी टायटन्स: 10षटकात 3बाद 88धावा(विनित पटेलिया 47(19,4×4,4×6), भावेश पाटोळे 15, दिनेश भोईर 1-11) पराभुत वि.जीएसटी जायंटस:9.4 षटकात 4बाद 92धावा(रोहन मारवाह 46( 24,4×4,2×6), राहुल गावंडे 23(16,4×4), चंद्रकांत बनकर नाबाद 12(2,2×6), विनित पटेलिया 2-16);
इन्कम टॅक्स टायगर्स: 10षटकात 5बाद 50धावा(अमित बोबडे 22, प्रतीक तित्रे 3-8, विश्वनाथ मुंढे 2-0) पराभुत वि.रेल्वे वॉरियर्स: 5 षटकात 1बाद 51धावा(नाहिद शेख 27(9,3×4,2×6) ), संग्राम अतितकर 1-3).