February 28, 2024

तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी क, टेनिस नट्स राफा संघांची विजयी सलामी

पुणे, 10 फेब्रुवारी 2024: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी क, टेनिस नट्स राफा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत  पीवायसी क संघाने सोलारिस गो गेटर्स संघाचा 22-16 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. 100अधिक गटात पीवायसीच्या राजेंद्र साठे व पराग चोपडा यांना सोलारिसच्या अश्विन हळदणकर व संदीप आगळे यांनी 4-6 असे पराभुत केले. 90 अधिक गटात पीवायसीच्या संग्राम पाटील व धृव मेड यांनी महेंद्र गोडबोले व अमोल गायकवाड यांचा 6-3 असा तर खुल्या गटात तन्मय चोभे व मिहीर दिवेकर यांनी शिव जावडेकर व आनंद परचुरे यांचा 6-4 असा पराभव करून आघाडी मिळवून दिली.खुल्या गटात पीवायसीच्या केदार देशपांडेने पराग चोपडाच्या सोलारिसच्या संतोष दळवी व सचिन लाखे यांचा 6-3 असा पराभव संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात टेनिस नट्स राफा संघाने पीसीएलटीए क्ले किंग्स संघाचा 19-11 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. विजयी संघाकडून जितेंद्र जोशी, सी कुमार, राहुल भोई, अतुल कमलापूरकर,  आलोक नायर, अंकित कापसे यांनी सुरेख कामगिरी केली.
निकाल: साखळी फेरी:
पीवायसी क वि.वि.सोलारिस गो गेटर्स 22-16(100अधिक गट: साठे/पराग चोपडा पराभुत वि.अश्विन हळदणकर/संदीप आगळे 4-6; 90 अधिक गट: संग्राम पाटील/धृव मेड वि.वि.महेंद्र गोडबोले/अमोल गायकवाड 6-3; खुला गट: तन्मय चोभे/मिहीर दिवेकर वि.वि.शिव जावडेकर/आनंद परचुरे 6-4; खुला गट: केदार देशपांडे/पराग चोपडा वि.वि.संतोष दळवी/सचिन लाखे 6-3);
टेनिस नट्स राफा वि.वि.पीसीएलटीए क्ले किंग्स 19-11(100अधिक गट: जितेंद्र जोशी/सी कुमार वि.वि.धर्मेश वाधवानी/विनोद कलोत्रा 6-4; 90अधिक गट: राहुल भोई/अतुल कमलापूरकर वि.वि.रघु नेक्कांती/विकास खेगडे 6-1; खुला गट: आलोक नायर/अंकित कापसे वि.वि.ॲलेक्स थॉमस/आशुतोष सोमण 6-0; खुला गट: अनिरुद्ध देवधर/शशांक माने पराभुत वि.कल्पेश मकणी/विकास चौधरी 1-6);