July 24, 2024

आय.सी.एस.सी दहावीच्या परीक्षेत डी एस के शाळेच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत घवघवीत यश

पुणे, दि. १९ मे, २०२३: नुकत्याच झालेल्या आय.सी.एस.सी  इयत्ता दहावीच्या परीक्षेत डी एस के शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  १००% लागला आहे. पृथ्वीराज खेडेकर या विद्यार्थ्याने ९७.८३% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला.

तर ९७.६७% प्राप्त करीत किमया खोरणा ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. याबरोबरच अनेका ग्यानपवार, क्रिती कुलकर्णी, ओम सोलासकर, वरिजा कुलकर्णी, वेदांत कुरुळेकर यांनी ९७.५०% प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. शाळेच्या या यशात माननीय मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.