October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: नर्‍हेत कोयताधारी पुन्हा टोळक्याचा राडा, तरुणावर खुनी हल्ला, कॅफेची तोडफोड

पुणे, दि.१९/०५/२०२३: शहरातील नर्‍हे परिसरात कोयताधारी टोळक्याने दहशत माजवित कॅफेची तोडफोड करुन तरुणावर खुनी हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा कोयताधारी टोळक्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपुर्वी कोयताधार्‍याने परिसरात धुडगूस घातल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना १७ मे रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास दुर्गा कॅफेत घडली आहे.

करण जांभळे, गणेश खांडेकर, मोन्या सुर्वे, मयूर परब, अक्षय बारगजे, यांच्यासह इतर दोन तीन जणांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर लोखंडे (वय ३२) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

सागरचा मित्र ऋषीकेश याच्या भावाच्या लग्नावेळी भांडण झाले होते. त्यावेळी सागरने मध्यस्थी केल्याचा राग टोळक्याला होता. त्याच रागातून टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा डाव रचला. १७ मे रोजी सागर आणि ऋषीकेश जेवण करण्यासाठी व्ही.आर. के. कॅफेत गेले होते. त्यावेळी टोळक्याने हातात कोयते घेउन दहशत माजविली. सागरवर हल्ला करीत त्याला गंभीररित्या जखमी केले. कॅफेत दगडफेक करीत खुर्च्यांची तोडफोड करीत नुकसान केले.