सोशिओ कॉर्प इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या दुसऱ्या सीएसआर चित्रपट महोत्सवाच्या समारोप व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी डॉ. रमण गंगाखेडकर बोलत होते. सोशिओ कॉर्प इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. चेतन गांधी, संचालिका सरस्वती मेहता, बाळासाहेब झरेकर, सतीश कोंढाळकर, विजय कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील कामाठीपुऱ्यातील भयावह परिस्थिती पाहून मी एडस् या रोगावर काम करायला सुरुवात केली, असे सांगत डॉ. गंगाखेडकर म्हणाले, “रुग्णाला जर पूर्णपणे बरे करायचे असेल तर त्याला तात्पुरती मदत करणे आवश्यक आहेच, मात्र भविष्यात त्याने स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी तुम्हाला काहीतरी करणे गरजेचे आहे. हीच मदत सीएसआरच्या माध्यमातून आज आपल्याला मिळू शकते हे लक्षात घ्यायला हवे. आपापल्या परीने तुम्ही करत असलेले कार्य हे मोठे आहेच पण शाश्वत धोरणांचा अवलंब हा सामाजिक आरोग्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवू शकतो.”
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आपल्या आजूबाजूच्या संस्था काय करीत आहेत, कोणते प्रश्न कशा पद्धतीने हाताळत आहेत हे एकत्रितपणे समजावून घ्यावे यासाठी एका व्यासपीठाची गरज होती. हीच गरज लक्षात घेत आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. केवळ सामाजिक प्रश्न न मांडता ते कलात्मकपणे नागरिकांसमोर यावेत हा सीएसआर चित्रपट महोत्सवाचा उद्देश असल्याची माहिती चेतन गांधी यांनी दिली.
यावेळी अनेक विभागात विजेत्या ठरलेल्या चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे-
बेस्ट सोशल अवेअरनेस फिल्म – काश (दिग्दर्शक- जुनैद इमाम)
बेस्ट स्कील डेव्हलपमेंट सीएसआर फिल्म – लक्ष (दिग्दर्शक – ऋषिकेश शेडगे)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन रुरल अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट – कॉल ऑफ दी हिल्स (दिग्दर्शक – कनू भारती)
ज्युरी मेन्शन बेस्ट हेल्थ केअर एक्सलन्स सीएसआर फिल्म – विनिंग अगेन्स्ट मालन्यूट्रीशन (दिग्दर्शक – शांती मेनन व परेश वोरा)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन कम्युनिटी डेव्हलपमेंट – शिवा १९९६ (दिग्दर्शक – रुची शर्मा)
बेस्ट कोविड १९ ह्युमॅनिटेरियन सीएसआर फिल्म – व्हॅक्सिनेटिंग दी व्हिलेजेस – दी स्टोरी ऑफ एएनएम वर्कर्स (दिग्दर्शक – शुभ्रस्मिता संदिल्या)
बेस्ट फिल्म ऑन चाईल्ड लेबर अवेअरनेस – निशाण (दिग्दर्शक – अरविंद भोसले)
बेस्ट मेंटल हेल्थ सोशल अवेअरनेस फिल्म – दी डार्क साईड ऑफ मून (दिग्दर्शक – डॉ. सागरिका गोल्डेर)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन कॉम्प्रीहेंसिव्ह डेव्हलपमेंट ऑन डिसॅबल्ड – प्रोजेक्ट बिंदू (दिग्दर्शक – मंजिरी गोखले – जोशी)
बेस्ट फिल्म ऑन एम्पॉवरिंग वूमेन – हॉरिझॉन, व्हेन ड्रीम टचेस स्काय (दिग्दर्शक – अप्सील अजोश)
बेस्ट वेस्ट मॅनेजमेंट सीएसआर फिल्म – सस्टेनेबल व्हिलेज वेस्ट मॅनेजमेंट (दिग्दर्शक – सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.)
बेस्ट सीएसआर डॉक्युमेंटरी फिल्म ऑन रुरल इकोनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन – ट्रान्सफॉमिंग इंडिया (दिग्दर्शक – ग्लोबल विकास ट्रस्ट)
बेस्ट हेल्थ डॉक्युमेंटरी फिल्म– दी सेव्हीयर ऑफ मासेस (दिग्दर्शक – श्यामा गर्ग)
बेस्ट सीएसआर अॅक्टीव्हिटीज अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट फिल्म – मूव्हिंग अहेड टूगेदर (दिग्दर्शक – सीएसआर टीम एचडीबी फायनान्शीयल सर्व्हिसेस अँड काऊच पोटॅटो मिडीया)
बेस्ट सोशल अवेअरनेस फिल्म ऑन चिल्ड्रन – माय हँड लाईक अ बर्ड (दिग्दर्शक – बेटिना द्रूमाँड व हॉर्टेन्स ब्रासार्ट)
बेस्ट हेल्थ केअर एक्सलन्स सीएसआर फिल्म – सारिका, (दिग्दर्शक – सीएसआर अँड सीसी डिपार्टमेंट , बाल्को)
बेस्ट सीएसआर फिल्म ऑन वुमेन्स डिजिटल ट्रान्सफॉरमेशन अँड सोशल इम्पॅक्ट – वूमेन ट्रान्सफॉरमिंग लाइव्हज विथ टेक्नोलॉजी (दिग्दर्शक – श्रीमान बिस्वजीत – बीओआय)
बेस्ट डिजिटल फायनान्शीयल लिटरसी सीएसआर फिल्म – डिजिटल सखी (दिग्दर्शक – सीएसआर टीम, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज)
बेस्ट पॅट्रीओटिक साँग – लेहेरायेगा तिरंगा (दिग्दर्शक – अरविंद भोसले)
More Stories
..तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला भरला पाहीजे – सुप्रिया सुळे
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील ७ मतदान केंद्र स्थलांतरीत
बटेंगे तो कटेंगे घोषणेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत मतभेद