July 27, 2024

एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत लॉ चार्जर्स, लॉ कॉलेज लायन्स, एमडब्ल्यूटीए 1 संघांची आगेकूच

पुणे, 19 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गटसाखळी फेरीत  लॉ चार्जर्स, लॉ कॉलेज लायन्स, एमडब्ल्यूटीए 1 या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून एलाईट डिव्हिजन गटात प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गट 1मध्ये श्रीनिवास रामदुर्ग, समीर सावला, संदीप माहेश्वरी, नितीन गवळी, समीर बाफना, श्रीनिवास रामदुर्ग यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर लॉ चार्जर्स संघाने पीवायसी एसेस संघाचा 19-15 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात लॉ कॉलेज लायन्स संघाने सोलारिस ईगल्सचा 19-17 असा पराभव केला. विजयी संघाकडून राहुल पंढरपुरे, संतोष जयभाई, अभिजित मराठे, शिवाजी यादव,  तारक पारिख, केतन जठार यांनी सुरेख कामगिरी केली.
अन्य लढतीत एमडब्ल्यूटीए 1 संघाने पीवायसी बॉम्बर्स संघाचा 24-04 असा पराभव केला. एमडब्ल्यूटीए 1 संघाकडून राजेश मंकणी, गजानन कुलकर्णी, पार्थ मोहपात्रा, सुमंत पॉल, विवेक खडगे, आशिष मणियार, प्रफुल नागवाणी, संतोष शहा यांनी अफलातून कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी: प्लेट डीव्हिजन:
गट 1: लॉ चार्जर्स वि.वि.पीवायसी एसेस 19-15(100 अधिक गट: श्रीनिवास रामदुर्ग/समीर सावला वि.वि. राजेंद्र साठे/केदार देशपांडे 6-5; 90 अधिक गट: संदीप माहेश्वरी/नितीन गवळी वि.वि.हनिफ मेनन/संजय बोथरा 6-3; खुला गट: समीर बाफना/श्रीनिवास रामदुर्ग वि.वि. केदार देशपांडे/तुषार नगरकर 6-1; खुला गट: सुमित राठी/ओंकार नामदास पराभुत वि.अंकुश मोघे/कल्पक पत्की 1-6);
 गट 3: लॉ कॉलेज लायन्स वि.वि.सोलारिस ईगल्स 19-17(100 अधिक गट: राहुल पंढरपुरे/संतोष जयभाई वि.वि.रवी कात्रे/संजीव घोलप 6-2; 90 अधिक गट: अभिजित मराठे/शिवाजी यादव वि.वि.सिद्धू बी/गिरीश साने 6-4; खुला गट: तारक पारिख/केतन जठार वि.वि.
अन्वित पाठक/निनाद वाहीकर 6-5; खुला गट: श्रीराम ओक/प्रशांत सेठी पराभुत वि.रवींद्र पांडे/सिद्धार्थ जोशी 1-6;
गट 2: एमडब्ल्यूटीए 1 वि.वि.पीवायसी बॉम्बर्स 24-04(100 अधिक गट: राजेश मंकणी/गजानन कुलकर्णी वि.वि. शिरीष साठे/धनंजय धुमाळ 6-0; 90 अधिक गट: पार्थ मोहपात्रा/सुमंत पॉल वि.वि.तन्मय आगाशे/आकाश 6-1; खुला गट: विवेक खडगे/आशिष मणियार वि.वि.शिरीष साठे/निशांत भांगे 6-2; खुला गट: प्रफुल नागवाणी/संतोष शहा वि.वि.नेहा ताम्हाणे/पराग टेपन 6-1).