July 24, 2024

केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी उपांत्यपूर्व फेरीत

पुणे, 05 मार्च 2023 – केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी, दुर्गा एसए संघांनी आपली विजयी कामगिरी कायम राखताना येथे सुरु असलेल्या एमएलए करंडक २०२३ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून माया सेवा संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सामने शासकीय पॉलिटेक्निकच्या मैदानावर सुरु आहेत.

रेंजहिल्स यंग बॉईज, लौकिक एफ.ए.संघांना पुढे चाल मिळाल्यामुळे त्यांनाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

पहिल्या सामन्यात केपी इलेव्हन संघाने इन्फंट्स एलिट एफसी संघाचा १-० असा पराभव केला. एकमात्र विजयी गोल प्रसाद पाधाने १३व्या मिनिटाला केला.

अन्य दोन सामन्यात दुर्गा एस.ए. आणि इंद्रायणी एस.सी संघांनी ३-० असा विजय मिळविला.

दुर्गा संघाने नयनेश दुर्गा, अभिषेक पाल, प्रबोध भोसलेने केलेल्या तीन गोलच्या जोरावर ग्रीनबॉक्स चेतक संघाचा पराभव केला.

इंद्रायणी संघाने नव महाराष्ट्राचा पराभव केला. मकरंद हरदेव, सुरज बहिरट आणि शुभम गायकवाड यांनी गोल केले.

निकाल –

दुर्गा एस ए. ३ (नयनेश दुर्गा १३वे मिनिट, अभिषेक पाल ५५वे मिनिट, प्रबोध भोसले ६१वे मिनिट) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक एफसी ०

केपी इलेव्हन १ (प्रसाद पाढा १३वे मिनिट) वि.वि. इन्फंट एफसी ०

इंद्रायणी एस.सी. ३ (मकरंद हरदेव २६वे मिनिट, सुरज बहिरट ३६वे मिनिट, शुभम गायकवाड ४८वे मिनिट) वि.वि. नव महाराष्ट्र ०