बाह्यवळण मार्गावर सूस खिंड परिसरात महिंद्रा शोरुमजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. त्या वेळी भरधाव वेगाने साताऱ्याकडे निघालेला ट्रक थांबलेल्या ट्रकवर आदळला. ट्रकमधील केबिनमध्ये चालक आणि त्याचा सहकारी अडकले. अपघाताची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाषाण केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ट्रकच्या केबीनचे नुकसान झाले होते. केबीनचा काही भाग कटर यंत्राने कापून जवानांनी दत्तू अंबू गोळे (वय ६०) आणि सूरज सुर्वे (वय ३०) यांची सुटका केली. त्यांच्या पायला दुखापत झाली होती. गोळे आणि सुर्वे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, लतेश चौधरी, विष्णू राऊत, ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे, ओंकार देशमुख, विकास कुटे आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.
More Stories
उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीएमएलकडून जादा बससेवांचा ताफा; १६ ते २० जूनदरम्यान आळंदी-देहू मार्गावर विशेष नियोजन
पुणे: आषाढी वारीतील दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जाहीर