October 16, 2025

एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत कॅटी वॉलनेट्स,एरियन हार्टोनो, स्टॉर्म हंटर यांची आगेकूच

मुंबई ९ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या कॅटी वॉलनेट्स, नेदरलँडच्या एरियन हार्टोनो, ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित कॅटी वॉलनेट्स हिने कोरियाच्या लकी लुझर ठरलेल्या सोहयुन पार्कचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर हिला पुढे चाल देण्यात आली. अलिना कॉर्निवाला बरे वाटत नसल्यामुळे तिने या स्पर्धेतून माघार घेतली. नेदरलँडच्या एरियन हार्टोनो हीने मागील आठवड्यात एनइसीसी आयटीएफ ५००००डॉलर स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या जपानच्या मोयुका उचीजिमाचा ६-३, ४-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. काल दुहेरीत एरियन हार्टोनो हीने भारताच्या प्रार्थना ठोंबरेच्या साथीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळेच एरियन हार्टोनोच्या दुहेरी मुकुटाच्या आशा कायम आहेत.

स्पर्धेच्या एकेरी व दुहेरी गटाचे उपांत्य सामने शनिवारी होणार असून अंतिम लढती रविवार, ११ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
कॅटी वॉलनेट्स(अमेरिका)(८)वि.वि.सोहयुन पार्क(कोरिया)६-१, ६-२;
एरियन हार्टोनो(नेदरलँड)वि.वि.मोयुका उचीजिमा(जपान)६-३, ४-३ सामना सोडुन दिला;
स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया)पुढे चाल वि.अलिना कॉर्निवा
दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि.पोलीना कुडेरमेटोव्हा(रशिया)

You may have missed