December 13, 2024

अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, खार लिजेंड्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 1 एप्रिल 2023: सहाव्या अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत गटसाखळी फेरीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, खार लिजेंड्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात  खार लिजेंड्स संघाने पीवायसी अ संघाचा 25-23 असा पराभव करून विजयी मालिका कायम ठेवली. विजयी संघाकडून भूषण अकुत, गौरव कपाडिया, इम्रान युसूफ, वर्धन शहा यांनी सुरेख कामगिरी केली. ब गटात महेंद्र लिखिते, रोहन माणिक, राजेश नायर, विमल रॉय, आदित्य संघवी, आकाश काळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघाने अमरावती जिल्हा संघाचा 28-21 असा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघाने पीवायसी ब संघाचा 27-22 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला.
पीवायसी अ आणि पीवायसी ब या संघांनी देखील उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पीवायसी अ विरुद्ध एमसीए यांच्यात पहिला सामना तर, दुसरा सामना पीवायसी ब विरुध्द खार जिमखाना यांच्यात सामना होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट ब: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वि.वि.अमरावती जिल्हा 28-21(110 अधिक गट: महेंद्र लिखिते/रोहन माणिक वि.वि.दिपक सोमय्या/रवी नगरकर 8-4; 100 अधिक गट: राजेश नायर/विमल रॉय वि.वि.नवीन पटेल/राहुल शर्मा 8-6; 90 अधिक गट: आनंद मूर्थी/करण सिंग पराभुत वि. जिमी टिंबोडिया/संजय चंदवानी 4-8; खुला गट: आदित्य संघवी/आकाश काळे वि.वि.रवी जैस्वाल/राजेश मंडले 8-3;
गट अ: खार लिजेंड्स वि.वि.पीवायसी अ 25-23(110 अधिक गट: भूषण अकुत/गौरव कपाडिया वि.वि.जयंत कढे/हिमांशू गोसावी 8-4; 100 अधिक गट: गौतम चांदे/लवीन खेमानी पराभुत वि.केदार शहा/प्रशांत गोसावी 3-8; 90 अधिक गट: इम्रान युसूफ/वर्धन शहा वि.वि.योगेश पंतसचिव/अमित लाटे 8-3; खुला गट: अमन कोहली/साहिल लांबा पराभुत वि.केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे 6-8);
गट ब: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वि.वि.पीवायसी ब 27-22(110 अधिक गट: महेंद्र लिखिते/रोहन माणिक वि.वि.अभय जमेनिस/सारंग देवी 8-5; 100 अधिक गट: विमल रॉय/राजेश नायर पराभुत वि.सुंदर अय्यर/अमित नाटेकर 1-8; 90 अधिक गट: करण सिंग/आनंद मूर्ती वि.वि.अनिरुद्ध साठे/मिहिर दिवेकर 8-1; खुला गट: आदित्य संघवी/आकाश काळे पराभुत वि.अमोघ बेहारे/रोहित शिंदे 7-8(3-7)).