May 18, 2024

पुणे स्टेशन परिसरात मेफेड्रोन तस्कराला अटक, १० लाखांवर एमडी जप्त

पुणे, दि. २२/०८/२०२३: पुणे स्टेशन परिसरात मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली . त्याच्याकडून १० लाख ३० हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. सोहेल युनूस खोपटकर वय 45 रा हिंदरिया इस्टेट नागपाडा मुंबई असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे स्टाफसह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सय्यद साहिल शेख आणि अझीम शेख यांना पुणे स्टेशन परिसरात लेमन ट्री हॉटेल शेजारी मेफेड्रोन तस्करी करणाऱ्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचुन सोहेलला ताब्यात घेत त्याच्याकडून १० लाखांवर किमतीचा ५२ ग्राम एमडी जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी. सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक, एस. डी.नरके, सय्यदसाहिल शेख, अझीम शेख, शिवाजी घुले, चेतन गायकवाड, महेश साळुंखे, संदीप शेळके, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांनी केली आहे.