October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

मुंबईत बाँम्बस्फोटात घडविण्याची धमकी, अमेरिकेतून पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात निनावी दूरध्वनी

पुणे, २२/०८/२०२३: पुणे पोलीस आयुक्तालयाताली नियंत्रण कक्षास अज्ञाताने दूरध्वनी करुन मुंबईत एकजण बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले. निनावी दूरध्वनी अमेरिकेतून करण्यात आल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीमुळे पोलिसांची धावपळ उडाली. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पुणे शहर पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात (कंट्रोल रुम) दूरध्वनी आला. मुंबईत एकजण बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्षास आलेल्या दूरध्वनीमुळे पोलिसांची धावपळ उडाली. या घटनेची माहिती त्वरीत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आली. तांत्रिक तपासात अमेरिकेतून दूरध्वनी केल्याचे उघडकीस आले. मुंबई पोलिसांनी अमेरिकेतील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले. खोडसाळपणे दूरध्वनी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.