May 18, 2024

एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत देशभरांतून 140हून अधिक खेळाडू सहभागी

पुणे,दि.17 नोव्हेंबर 2023:  नवसह्याद्री क्रीडा संकूल व शेपींग चॅम्पियन्स यांच्या संलग्नतेने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए –  नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत देशभरातून 140 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे दि.17 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक केतन धुमाळ यांनी सांगितले की, स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि राजस्थान या ठिकाणांहून 140 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेला पिनाकल ग्रुप यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत स्मित उंडरे, प्रद्युम्न ताताचर, मायरा टोपनो, काव्या देशमुख, श्रावी देवरे, स्वर्णीम येवलेकर, नमिश हुड, शौर्य गडदे हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्याला 15 एआयटीए गुण व करंडक तर उपविजेत्याला 12 गुण व करंडक पारितोषिक मिळणार असल्याची माहिती धुमाळ यांनी दिली.