पुणे, 17 नोव्हेंबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथा विजय नोंदवला.
सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नीलमेघ नागावकर(नाबाद 133 व 1-31)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर 22 यार्ड्स क्रिकेट अकादमी संघाने सहारा क्रिकेट अकादमीचा 7 गडी राखून पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात अभिषेक टोपनो(78 धावा व 1-16) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने एके स्पोर्ट्सचा 153 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 43 षटकात 5बाद 221धावा(अभिषेक टोपनो 78(79,12×4), तरुण श्रीकृष्णन नाबाद 35, प्रज्वल मोरे 26, श्रावण राठोड 26, अर्जुन गायकवाड 15, प्रांजली पिसे 1-21, प्रथमेश कुंभार 1-4)वि.वि.एके स्पोर्ट्स: 24.4 षटकात सर्वबाद 68धावा(अथर्व आखाडे 29, राजवीर देशमुख 11, वीरेन मिरजे 3-17, सुबोध दैठणकर 2-10, अभिषेक टोपनो 1-16); सामनावीर -अभिषेक टोपनो; व्हेरॉक संघ 153 धावांनी विजयी;
सहारा क्रिकेट अकादमी: 38.5 षटकात 9बाद 255धावा(नरेंद्र इंचुरे 68(75,13×4), वरद प्रधान नाबाद 53(47,9×4), संस्कार ढवळे 51(41,9×4,1×6), इशान शेळके 23, अक्षत लाहोटी 2- 28, नीलमेघ नागावकर 1-31) पराभुत वि.22 यार्ड्स क्रिकेट अकादमी: 24.4 षटकात 3बाद 259धावा(नीलमेघ नागावकर नाबाद 133(72,20×4,5×6), युवराज भाटिया 85(66,12×4,2×6), शर्वय बावस्कर 1-23);सामनावीर-नीलमेघ नागावकर; 22 यार्डस संघ 7 गडी राखून जिंकला.
More Stories
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून