July 24, 2024

एमएसएलटीए – पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 14 वर्षाखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत श्रावी देवरेचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे, 19 एप्रिल 2023: अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, पीएमडीटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 14 वर्षाखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रावी देवरे हिने चौथ्या मानांकित वरा ईश्वरचा 6-0, 6-1 असा सहज पराभव सनसनाटी निकाल नोंदवला.

पाषाण रोड येथील सीपीआर व एनसीएल टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित सानवी मिश्राने क्वालिफायर आयुश्री तरंगेचा 7-5, 6-4 असा, तर दुसऱ्या मानांकित रीशिता पाटीलने स्वरा जावळेचा 4-6,6-1,6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

मुलांच्या गटात अव्वल मानांकित सनत कडलेने अंश रमाणीचा टायब्रेकमध्ये 6-7(5),6-4, 6-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सातव्या मानांकित स्मित उंद्रेने मेधांश खंडेलवालचा 6-4, 7-6(7), 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. आठव्या मानांकित सक्षम भन्साळीने निलय ढवळेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: मुली:
सानवी मिश्रा(1)वि.वि.आयुश्री तरंगे 7-5, 6-4;
आरोही देशमुख(7)वि.वि.अस्मी टिळेकर 7-5, 6-1;
शिबानी गुप्ते(8)वि.वि.सम्राज्ञी दळवी 6-2, 6-2;
स्वनिका रॉय(3)वि.वि.वीरा हरपुडे 6-2, 6-0;
श्रावी देवरे वि.वि.वरा ईश्वर(4) 6-0, 6-1;
जान्हवी चौगुले वि.वि.अर्शी शेट्टी 6-1, 6-2;
साझी जैन(5)वि.वि.मानसी ताम्हणकर 7-5, 6-1;
रीशिता पाटील(2)वि.वि.स्वरा जावळे 4-6,6-1,6-1;

मुले:
सनत कडले(1)वि.वि.अंश रमाणी 6-7(5), 6-4, 6-1;
स्मित उंद्रे(7)वि.वि.मेधांश खंडेलवाल 6-4, 7-6(7), 6-2;
नमिश हुड वि.वि.समिहन देशमुख 6-1, 6-3;
स्वर्णिम येवलेकर वि.वि.आरव पटेल 6-1, 6-4;
ध्रुव सेहगल वि.वि.शिवराज जाधव 7-5, 6-1;
सक्षम भन्साळी(8)वि.वि.निलय ढवळे 6-0, 6-0;
जोशुआ डिक्रूझ वि.वि.अंशुल पुजारी 6-2, 7-6(4);
प्रज्ञेश शेळके(2)वि.वि.आर्यन किर्तने 7-6(2), 6-2.